सायकल चालवणे शरीरासाठी चांगले असले तरी, 'या' लोकांसाठी मात्र ते धोकादायक

सायकलिंगचे अनेक आरोग्य फायदे आहेत, परंतु काही लोकांसाठी सायकल चालवणे ही समस्या बनू शकते

Updated: Aug 17, 2022, 10:08 PM IST
सायकल चालवणे शरीरासाठी चांगले असले तरी, 'या' लोकांसाठी मात्र ते धोकादायक title=

मुंबई : निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेणे जेवढे गरजेचे आहे, तेवढेच आवश्यक आहे व्यायाम करणे. याचे कारण म्हणजे व्यायाम केल्याने तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगीही राहता. परंतु बरेचसे असे लोक आहेत. सायकल चालवणं शरीरासाठी जास्त फायद्याचं मानतात. सायकल चालवण्याचे फायदे हे आपल्याला जिममध्ये मिळणाऱ्या फायद्यासारखेच आहेत. असं देखील म्हटलं जातं की, सायकल चालवल्याने तुम्हाला फक्त शारीरिक फिटनेस मिळत नाही. तर यामुळे तुमचे मानसिक आरोग्यही सुधारते.

पण सायकल चालवणे प्रत्येकासाठी फायदेशीर आहे का? अर्थात, सायकलिंगचे अनेक आरोग्य फायदे आहेत, परंतु काही लोकांसाठी सायकल चालवणे ही समस्या बनू शकते. अशा परिस्थितीत कोणत्या लोकांनी सायकल चालवू नये हे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.

त्यापूर्वी आपण सायकलिंगचे फायदे जाणून घेऊ या

हृदयासाठी फायदेशीर

दररोज सायकल चालवल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवल्याने हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकाही कमी होतो.

वजन कमी होणे

सायकलिंगमुळे वजन कमी होण्यास मदत होते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही सायकलिंग करू शकता.

मानसिक आरोग्य सुधारते-

सायकल चालवल्याने मानसिक आरोग्यही सुधारते. रोज सायकल चालवल्याने चिंता, तणाव यांसारख्या समस्यांचा धोकाही कमी होतो. सायकल चालवल्याने मेंदूच्या नव्हे तर हिप्पोकॅम्पसमधील पेशी तयार होण्यास मदत होते. जे तुमची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी जबाबदार असतात.

चला आता जाणून घेऊ या की, कोणत्या लोकांनी सायकल चालवू नये

जर तुम्हाला सांध्याचा त्रास होत असेल, तर सायकल चालवल्याने तुमची समस्या वाढू शकते. याशिवाय जर तुम्हाला अस्थमा, ब्रोकायटिस इत्यादी श्वसनाच्या समस्या असतील, तर अशावेळी तुम्ही सायकल चालवणे टाळावे. कारण जेव्हा सायकल चालवताना हृदय गती वाढते, ज्यामुळे श्वास घेताना त्रास होऊ शकतो.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)