पहिल्या भेटीत मुलामधल्या या '5' गोष्टींवर असते मुलींची नजर !

आजकाल मुलांच्या बरोबरीने मुली काम करतात. 

Updated: Jul 11, 2018, 08:48 PM IST
पहिल्या भेटीत मुलामधल्या या '5' गोष्टींवर असते मुलींची नजर !

मुंबई : आजकाल मुलांच्या बरोबरीने मुली काम करतात. केवळ करियरबाबता नव्हे तर मुली त्यांच्या लाईफ पार्टनरच्या निवडीबाबतही अगदी चोखंदळ झाल्या आहेत. आज आवडत्या मुलाला थेट प्रपोज करून लग्नाची मागणी घालायला त्या घाबरत नाही. मग मुलांनो ! तुम्ही त्यांच्यावर पॉझिटिव्ह इंम्प्रेशन पाडण्यासाठी प्रयत्न करत असाल तर या गोष्टींकडे मूळीच दुर्लक्ष करू नका कारण मुली पार्टनरची निवड करताना या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष देतात. 'या' वयातील महिला अधिक रोमॅन्टिक !

1. बॉडी लॅग्वेज - 

पहिल्याच मुलाखतीमध्ये मुलांच्या बॉडी लॅग्वेंजकडे त्यांचं हमखास लक्ष असतं. पहिल्या डेटवर जाताना मुलगा कसा बोलतोय, त्याच्यात किती आत्मविश्वास आहे? उठण्याबसण्याची स्थिती कशी आहे? यावरून त्यांच्यामधील आत्मविश्वास समजतो. डोळ्यांमध्येही त्यांच्या मनात काय चाललय याचा अंदाज बांधता येतो. या ५ इशाऱ्यांवरुन जाणा समोरची व्यक्ती तुमच्यावर फिदा आहे!

2. बोलण्याचा अंदाज - 

रिलेशिनमध्ये वर्षानुवर्ष एकमेकांची ओळख झाल्यानंतर ते कसे बोलतात? याचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. मात्र पहिल्या मुलाखतीमध्ये मुलगा वेटरशी कसा बोलतो? मुलींशी कसा बोलतो? यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. जोडीदाराची निवड करताना या ५ गुणांचा विचार करा!

3. दिखाऊपणा - 

पहिल्या डेटवर अनेकदा मुलं ब्रॅन्डेड कपडे, दागिने किंवा खास वस्तू  वापरतात. अनेकदा त्याचा वारंवार बोलण्यात उल्लेख करतात. स्टेट्स आणि ब्रॅन्डसचा सतत उल्लेख म्हणजे त्यांना दिखाऊपणा करायचा असतो. त्यांच्यामधील अहंकाराच्या भावनेचा यावरून अंदाज लावता येऊ शकतो. त्यामुळे अशा मुलांना मुली रिजेक्ट करण्याची शक्यता अधिक असते.  

4. पहिल्याच मुलाखतीमध्ये तुम्हांला त्यांना इंम्प्रेस करायचे असेल तर त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करा. तुमच्या कुटुंबाची त्याला माहिती द्या. तुम्ही कोणाच्या अधिक जवळ आहात? याबाबत खुलेपणाने बोला. यामुळे तुमच्या आयुष्यात कुटुंबाला असणार्‍या स्थानाचा अंदाज येतो.  'क्रश'ला समोर पाहून मुलींकडून हमखास होतात 'या' चूका

5. मम्माज बॉय - पहिल्या मुलाखतीमध्येच जर मुलगा आईबाबत बोलतं असेल, तिच्याशी असलेल्या अधिक जवळीकीबद्दल बोलत असेल तर समजा हा ' मां का लाडला' आहे. अशावेळेस मुली त्यांचं रिलेशन थोडं सांभाळूनच पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. मुलींंनो ! तुम्ही योग्य साथीदारासोबत असल्याचे '10' संकेत !

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close