मुंबई : लग्नानंतर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात जो महत्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे मात्रृत्व. आई होणं म्हणजे स्त्रीवर मोठी जबाबदारी असणं. त्यामुळे अशावेळी महिलांनी आपली काळजी घेणं गरजेचं आहे. एवढंच काय तर हेल्दी आणि चांगलं बाळ हवं असेल, तर महिलांनी प्रेग्नेंट होण्यापूर्वीच काही गोष्टींचं नियोजन करावं. याचा मुलाला आणि आईला खूप मोठा फायदा होतो. हे लक्षात घ्या की बाई जर स्वतःला आतून निरोगी फील करत असेल, तेव्हाच ती निरोगी बाळाला जन्म देऊ शकता. अनेक वेळा रोजच्या काही वाईट सवयींमुळे महिलांना गरोदर राहण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. येवढंच नाही तर होणाऱ्या बाळाला देखील इतर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशा परिस्थितीत, गर्भधारणा होण्यासाठी प्रत्येक महिलांनी त्यांच्या या वाईट सवयी टाळल्या पाहिजेत, असं डॉक्टर सांगतात. आता त्या सवयी कोणत्या या जाणून घ्या.
फ्रेंच फ्राय, फ्राईड ओनियन रिंग्ज, चिकन नगेट्स इत्यादी गोष्टी खायला खूप चविष्ट असतात, पण या सगळ्या गोष्टी तुमच्या गर्भधारणेच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतात. वास्तविक, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ किंवा प्रक्रिया केलेले मांस, जसे की सॉसेज, सलामी इत्यादींमध्ये असे काही संरक्षक असतात, ज्यामुळे शरीरात जळजळ होते. यामध्ये चायनीज फूड आणि पॅकेज्ड फूड, रेडी टू इट फूड यांचाही समावेश आहे.
त्यामध्ये उच्च सोडियम पातळी असते, ज्यामुळे कधीकधी गर्भधारणेची शक्यता कमी होते. तुमच्या शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी आणि तुमच्या शरीराला गर्भधारणेसाठी तयार करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांऐवजी फळे आणि भाज्यांसारखे निरोगी पदार्थ खाण्याची खात्री करा.
तुमच्या शुक्राणू किंवा अंड्याच्या पेशींसाठी धूम्रपानाची सवय चांगली नाही. नियमितपणे धूम्रपान करणाऱ्या महिलांच्या गर्भाशयावर याचा परिणाम होतो. तसे पुरुषांच्याही धुम्रपान करणाचा परिणाम गर्भधारणेवर होतो. पुरुषांमध्ये शुक्राणूंची गती 13% कमी असते, जी शुक्राणूंना अंड्यापर्यंत पोहोचू देत नाही. ज्यामुळे गर्भधारना होणे कठीण होते.
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने शुक्राणूंची गतिशीलता कमी होते, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. गर्भधारणेचा प्रयत्न करताना महिलांनी दारू पिणे टाळले नाही तर यामुळे गर्भातील मुलाला अल्कोहोल सिंड्रोम देखील होऊ शकतो.
ज्या स्त्रिया गरोदर राहण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी न शिजवलेले दुग्धजन्य पदार्थ, कच्चे मांस, मऊ चीज, सुशी, उच्च-पारा असलेले मासे, इत्यादी जोखमीचे पदार्थ खाणे टाळावे. हे सर्व पदार्थ गर्भाच्या संसर्गावर परिणाम करू शकतात. ज्यामुळे जन्मत: कमी वजन, अकाली प्रसूती आणि काही प्रकरणांमध्ये भविष्यात गर्भपात यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
ताणतणाव अनेक आजारांना जन्म देऊ शकतो. गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी, तणावाचा सामना करण्यासाठी स्वतःला चांगले तयार करा. यासाठी योगासन करा. व्यायाम, ध्यान अशा गोष्टी करणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुमचा ताण कमी होऊ शकतो.