तुमची सारखी चिडचिड होतेय आणि जास्त राग येतो का? या 5 सवयी असू शकतात कारणीभूत...

सकाळचा आहार खूप समृद्ध असावा कारण सकाळी नाश्ता केल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते.

Updated: Aug 11, 2021, 05:30 PM IST
तुमची सारखी चिडचिड होतेय आणि जास्त राग येतो का? या 5 सवयी असू शकतात कारणीभूत... title=

मुंबई : तुम्ही अनेकदा हे ऐकले असेल की, नाश्ता हा राजासारखा केला पाहिजे, म्हणजेच सकाळचा आहार खूप समृद्ध असावा कारण सकाळी नाश्ता केल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते. पण जे लोक सकाळी नाश्ता करत नाहीत, त्यांचे शरीर ऊर्जा साठवून ठेवण्यास सक्षम नसते. अशा लोकांच्या शरीरात पोषक घटकांची कमतरता असते आणि शरीर आतून कमकुवत होते. यामुळे अशा लोकांच्या स्वभावात राग आणि चिडचिडी जास्त होते

काही लोकांना मिठाई  किंवा गोड खायला खूप आवडते. पण जास्त साखर खाल्याने आपल्या मेंदूचे कार्ये विस्कळीत होते. वास्तविक, जास्त साखर खाल्ल्याने, शरीरातील सूक्ष्म पोषक घटकांसह प्रथिने शोषण्याची प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे मेंदूवरही परिणाम होतो. अशा स्थितीत थकवा, संतापाची भावना असते. स्मरणशक्तीवर देखील विपरित परिणाम होतो आणि कधीकधी मेंदूचा विकासही मंदावतो.

झोपेचा अभाव देखील अनेक आजारांना कारणीभूत ठरतो. निरोगी शरीर आणि मनासाठी 8 ते 9 तासांची झोप आवश्यक आहे. पण जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर त्या व्यक्तीला विसरण्याची समस्या आहे. शरीरात थकवा जाणवतो, डोकेदुखी आणि तणाव असतो आणि मनःस्थिती बदलू शकते.

जर तुम्हाला डोकं किंवा तोंड झाकून झोपायची सवय असेल, तर ही सवय तुमच्या मानसिक समस्यांचे एक मोठे कारण बनू शकते. डोके झाकून झोपल्याने मेंदूच्या पेशींची वाढ थांबते आणि ऑक्सिजनचे प्रमाण देखील कमी होते. त्याचे गंभीर परिणाम देखील होऊ शकतात. त्यामुळे डोके झाकून झोपण्याची सवय सोडा.

आजकाल लोकांमध्ये संयमाचा अभाव आहे आणि ते छोट्या छोट्या गोष्टींवरही प्रतिक्रिया देतात. ओव्हररिएक्शन देताना अनेक वेळा आपण चुका करतो आणि नंतर त्याबद्दल पश्चात्ताप करतो. अशा परिस्थितीत मूड खराब होतो आणि राग येतो. म्हणून, कोणत्याही विषयावर त्वरित प्रतिक्रिया देण्यापूर्वी, नेहमीच एकदा विचार करत जा.