त्रास सहन करूनही मुली या '6' कारणांसाठी नातं जपतात !

मुलांच्या तुलनेत मुली रिलेशनशीप जपण्याबाबत अधिक गंभीर असतात

Updated: Jul 19, 2018, 08:23 PM IST
त्रास सहन करूनही मुली या '6' कारणांसाठी नातं जपतात !  title=

मुंबई : मुलांच्या तुलनेत मुली रिलेशनशीप जपण्याबाबत अधिक गंभीर असतात. मुली नातं टिकवण्यासाठी अधिक प्रयत्न करतात. अनेक मुली स्वभावाने सोशिक असल्याने सहाजिकच त्यांचा कल नातं जपण्याकडे असतो. रिलेशनशीप किंवा लग्नानंतरही अनेक स्त्रिया थेट टोकाचं पाऊल उचलण्यापेक्षा होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करतात. 

मुली अशाप्रकारे नातं जपण्यासाठी खास प्रयत्न का घेतात? 

1.नात्यामध्ये मुली अनेकदा सकारात्मक असतात. संयम आणि आशावादी असणार्‍या मुली सारं काही ठीक होईल. एक दिवस पुन्हा विस्कटलेली घडी बसेल अशी त्यांना आशा असते. 

2. प्रामुख्याने प्रेमविवाहात नात्याची जबाबदारी ही त्या दांम्पत्यावर असते. त्यामुळे दोघांमध्ये खटके उडत असले तरीही मुली पडती बाजू सांभाळत सारे निभावून नेण्याकडे प्रयत्न करतात. लोकं किंवा कुटुंबातील इतर व्यक्ती मुलींनाच दोष देतील या भीतीने त्या सारं सहन करतात.  

3. काही मुली रिलेशनशीपला खूपच गंभीर्याने घेतात. यामुळेच त्या साथीदारापासून दूर जाऊ शकत नाही या भीतीने सारं सहन करतात. 

4. साथीदाराची वाईट वर्तवणूक सहन करण्यामागे काही मुलींना त्यांची प्रायव्हसी रिव्हिल होण्याची भीती असते. 

5. लोकं काय म्हणतील या भीतीने किंवा साधं एक नातं सांभाळता येत नाही? या लोकांच्या 'जजमेंटल' होण्याच्या भीतीने अनेक्दा मुली बिघडलेलं नातंहि सांभाळत असतात. 

6. नातं तुटलं तर लोकं काय म्हणतील या भीतीने अनेकजणी खराब झालेलं नातं, त्याचा त्रास निमुटपणे सहन करत राहतात.