'या' टीप्सने रात्री सतत वॉशरूमला जाण्याची समस्या राहील आटोक्यात !

रात्रीच्या वेळेस अनेकजणांना सतत वॉशरूममध्ये जावं लागत असल्याने झोपमोड असते. 

Updated: May 15, 2018, 08:07 PM IST
'या' टीप्सने रात्री सतत वॉशरूमला जाण्याची समस्या राहील आटोक्यात ! title=

मुंबई : रात्रीच्या वेळेस अनेकजणांना सतत वॉशरूममध्ये जावं लागत असल्याने झोपमोड असते. रात्री मूत्रविसर्जनाची किंवा वॉशरूमला जावं लागण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असू शकतात. यामध्ये काही आजारांचे संकेत दडलेले आहेत. मात्र सोबतच आपल्या काही चूकीच्या सवयींमुळेही रात्री सतत वॉशरूमला जावं लागतं.  

कसा टाळाल तुमचा 'हा' त्रास? 

संध्याकाळी किंवा रात्री उशिरा व्यायाम करण्याची सवय असल्यास ती टाळा. यामुळे रात्रीच्या वेळेस वॉशरूमला जाण्याची इच्छा वाढते. 

रात्री उशीरा खूप पाणी पिऊ नका. झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय असेल तर टाळा. मूत्रल घटक म्हणजेच diuretics असणारे पदार्थ टाळावेत. रक्तदाबाची औषधं घेणार्‍यांमध्ये रात्री वॉशरूमला जावं लागते. तुम्हांला हा त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं बदलून घ्या. 

महिलांमध्ये युरिनरी ट्रक इंफेक्शनचा धोका अधिक असतो. त्यामुळे तुम्हांला मूत्रविसर्जनाच्या वेळेस जळजळ, त्रास, वेदना जाणवत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. युरिनरी ट्रॅक  इंफेक्शनकडे दुर्लक्ष करू नका. 

पुरूषांना रात्री सतत वॉशरूमला जावं लागत असेल तर प्रोस्टेड ग्रंथीची तपासणी करणं आवश्यक आहे. चाळीशी पार पाडलेल्यांनी या टेस्ट करणं आवश्यक आहेत.