Happy Hormones म्हणजे काय? जाणून घ्या ते कसे ठरतात तुमच्या आनंदाचं कारण

How to Boost Happy Hormones Naturally: तुम्हाला तुमच्या शरीरातील हार्मान्स नैसर्गिक (Happy Hormones) पद्धतीनं वाढवायचे असतील तर तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. परंतु तुम्हाला माहितीये का, नक्की हे हॅप्पी हार्माेन्स कोणते आणि त्याचा (How to Increase Happy Hormones) आपल्या जीवनात कसा उपयोग होतो. 

Updated: Apr 21, 2023, 05:36 PM IST
Happy Hormones म्हणजे काय? जाणून घ्या ते कसे ठरतात तुमच्या आनंदाचं कारण title=

What are Happy Harmones: आपण कायमच ऐकत आलोय की आपले मूड स्विंग्स (Mood Swings) होतात याचा अर्थ आपल्या शरीरात अनेक प्रकारचे हार्माेनल बदल हे होत असतात. आपण ऐकतो ते अगदी खरं आहे. कारण आपला मूड बनवण्याचे आणि बिघडण्याचे कारण (What are Hormonal Reasons behind Hapiness)  हे आपले शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलावर अवलंबून असतात. तुम्हाला एखादी सुंदर मुलगी दिसली किंवा कोणी हॅण्डसम मुलगा दिसला तर आपल्याला आतून प्रचंड आनंद होतो. आपल्या मनात अशी स्पंदन फूटायलाही आपल्या शरीरातील हार्माेन्स कारणीभूत ठरतात.

तुम्हाला जाणून गंमत वाटेल की आपल्या शरीरातील हे हार्माेन्स फार महत्त्वाची भुमिका बजावतात. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की, नक्की हे हार्मान्स कोणते आणि नैसर्गिक पद्धतीनं आपण आपले हॉर्मान्स कसे वाढवू शकतो. आपल्या शरीरात अनेक नानाप्रकारचे हार्माेन्स (Types of Hormones) असतात. एंडोर्फिन, डोपामाइन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन असे हार्मोन्स असतात. यातील प्रत्येकाबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ. सेरोटोनिन हे हार्मोन आपल्या पोटाशी संबंधित असते. हे हार्मान आपली पचनक्रिया सुदृढ ठेवण्यास मदत करते. हे हार्मोन वाढविण्यासाठी सुकामेवा आणि तुपाचे सेवन करू शकता. (what are happy hormones how you can increase happy hormones in your body naturally)

आपल्या शरीरात कोणते हार्मोन्स असतात? 

डोपामाइन हे हार्मोही फार महत्त्वापुर्ण भुमिका बजावते. तुम्हाला तुमचं काम पुर्ण झालं की त्यांना प्रचंड आनंद होतो. तेव्हा या आनंदाचे कारण आहे ते म्हणजे डोपामाइन हे संप्रेरक. ते वाढल्यानं आपल्याला आनंद होतो. ऑक्सिटोसिन या संप्रेरकामुळे तुमच्या प्रेमाची भावना निर्माण होते. आपल्यात आपल्या प्रेयसीबद्दल, प्रियकराबद्दल, आईवडिलांबद्दल जेव्हा प्रेमाचे नाते (Feeling of Love) तयार होते तेव्हा हे हार्मोन तयार होते. तेव्हा आपल्या आयुष्यातील हे हार्मोन हे सर्वात महत्त्वाचे आहे. एंडोर्फिन आपल्या मनाला शांत ठेवण्याचे काम करते. आपल्या मनात अनेकदा नानातऱ्हेचे विचार येत असतात तेव्हा या हार्मोनची वाढ होते.

नैसर्गिक पद्धतीनं वाढवा हार्मोन्स 

तुम्ही हे हार्मोन्स नैसर्गिक पद्धतीनं वाढवू शकता. त्यासाठी तुम्ही रोज योग्य व्यायाम, चांगलं खाणं आणि चांगली शांत झोप घेणे आवश्यक असते. मुळात आपल्याला शारिरीक आणि मानसिक शांतता हवी असते तेव्हा या हॉर्मान्सला वाढविण्यासाठी तुम्ही योग्य ते डाएट आणि एक्सरसाईज करा. आपल्या आहारात तुम्ही दुध आणि हळदीचाही (Natural Remedies to Increse Your Hormone) वापर करून घेऊ शकता. एल्फा लॅक्टालब्युमिनमुळे सेरोटोनिनची निर्मिती होते. याद्वारे तुमचा मूड सुधारतो. तुम्हाला जर का फारच जास्त प्रमाणात जंक फूड खात असाल तर वेळीच थांबवा.  

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)