या दोन तासाच्या वेळेत उन्हात मूळीच विनाकारण फिरू नका !

आजकाल अनेकांमध्ये 'व्हिटॅमिन डी' ची कमतरता हमखास जाणवते. प्रामुख्याने महिलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता कमी करण्यासाठी इंजेक्शन किंवा गोळ्यांचा वापर केला जातो. 

Updated: Apr 6, 2018, 10:27 AM IST
या दोन तासाच्या वेळेत उन्हात मूळीच विनाकारण फिरू नका !  title=

मुंबई : आजकाल अनेकांमध्ये 'व्हिटॅमिन डी' ची कमतरता हमखास जाणवते. प्रामुख्याने महिलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता कमी करण्यासाठी इंजेक्शन किंवा गोळ्यांचा वापर केला जातो. 
नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी वाढवण्यासाठी सूर्यप्रकाशात बसण्याचा सल्ला दिला जातो. परंतू तुम्ही कोणत्या वेळेत उन्हात बसता यावर त्याचे आरोग्यदायी परिणाम अवलंबून असतात. 

त्रासदायक वेळ कोणती ? 

12-2 या वेळेत थेट सूर्यकिरणांचा आरोग्यावर आणि त्वचेवरही दुष्परिणाम होऊ शकतो. दुपारच्या वेळेमध्ये सूर्यकिरण प्रखर असल्याने या काळात थेट सूर्यप्रकाशात गेल्यास सूर्यकिरणातील युव्ही रेज त्वचेला त्रासदायक ठरू शकतात. 

सूर्यप्रकाशातील घातक किरण शरीरात ऑक्सिजन मॉलिक्युल्स निर्माण करत नाहीत. यामुळे त्वचा शुष्क होणं, अकाली सुरकुत्या पडणं अशा समस्या वाढू शकतात. फळांंच्या मदतीने उन्हाळ्यात कमी करा सनटॅनची समस्या 

सनस्क्रीनच्या वापराने टॅनिंग टाळता येते का ? 

अनेकांना असे वाटते की सनस्क्रीन लावून बाहेर पडल्याने त्वचेला होणारे नुकसान टाळता येऊ शकते. पण वास्तवात सनस्क्रीनची निवड तुमच्या त्वचेला मिळतीजुळती असणं गरजेचे आहे.  

नियमित सनस्क्रीन लोशन लावणं गरजेचे आहे.  त्वचेला हेल्दी ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात सनस्क्रीन दर दोन तासांनी लावणं गरजेचे आहे. 

घराबाहेर पडण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी त्वचेवर सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे. केवळ त्वचेवर सनस्क्रीन लावून थेट बाहेर पडल्यास त्वचेला कोणताच फायदा होऊ शकत नाही.  

उन्हाळ्यात बाहेर पडण्यापूर्वी तसेच उन्हात फिरत असल्यास शरीरातील डिहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी मुबलक पाणी पिणं गरजेचे आहे. तसेच पूर्ण बाह्याचे कपडे घालणार नसाल तर शरीरावर कुलिंग जेल लावावे. उन्हाळ्यात मुबलक पाणी पिण्याची सवय वाढवतील या ट्रीक्स !