Winter skincare : थंडीत दही बनवेल स्किनला आणखी सॉफ्ट...ड्राय स्किनची चिंताच विसरा

दह्याला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. दह्यावरचं पाणी प्यायल्याने भूक वाढते असं म्हणतात. आपल्या आहारात जेवढं दह्याचं महत्त्व आहे. तेवढंच महत्त्व त्वचेसाठी देखील आहे. 

Updated: Nov 23, 2022, 08:22 AM IST
Winter skincare : थंडीत दही बनवेल स्किनला आणखी सॉफ्ट...ड्राय स्किनची चिंताच विसरा title=

Winter Care Beauty tips : हिवाळा सुरु झाला आहे... (winter started) सकाळच्या वेळेत हवेत  गारवा जाणवू लागला आहे, सर्वाना ही बोचरी गुलाबी थंडी हवीहवीशी वाटते, पण तुम्हाला हे माहीतच असेल थंडीचा सर्वात वाईट परिणाम सर्वात आधी त्वचेवर जास्त होऊ लागतो. (winter damage your skin)  हवा कोरडी असते त्यामुळे त्वचा आणखी ड्राय (dry skin) होऊ लागते परिणामी  चेहरा काळवंडू लागतो आणि त्वचेवरील तेज कमी होत. अशावेळी घरच्या घरी काही उपाय करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. (home remedies for dry skin in winter)

दही ठरेल रामबाण 

दह्याला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. दह्यावरचं पाणी प्यायल्याने भूक वाढते असं म्हणतात. आपल्या आहारात जेवढं दह्याचं महत्त्व आहे. तेवढंच महत्त्व त्वचेसाठी देखील आहे. तुम्ही दह्याचा वापर आपलं सौंदर्य खुलवण्यासाठीही करू शकता. कसा ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ( use curd to make skin youthful and look beautiful )

दही आणि मध (curd and honey)

दही आणि मध यांचे मिश्रण त्वचेला आतून पोषण देईल आणि ती मऊ, सॉफ्ट आणि हायड्रेटेड राहील. (hydrated skin)  अर्धा कप घट्ट दही घ्या आणि त्यात २ चमचे मध  चांगले मिसळा आणि आपला चेहरा आणि मानेवर हा मास्क लावा.  20 मिनिटांनी कोरडे होऊ द्या आणि धुवा.

दही आणि स्ट्रॉबेरी (curd and strawberry)

स्ट्रॉबेरीमध्ये असलेले सॅलिसिलिक अॅसिड (salicyclic acid) आणि दह्याच्या हायड्रेटिंग गुणधर्मांसह तुम्हाला त्वरित चमकदार त्वचा देईल.  2-3 ताज्या स्ट्रॉबेरी एक कप दह्यामध्ये मिसळा.  ब्रशच्या सहाय्याने चेहरा आणि मानेवर लावा. कोरडे होऊ द्या आणि थंड पाण्याने धुवा.

दही आणि बेसन (curd and besan )

दही आणि बेसनाचे एक्सफोलिएटिंग गुणधर्म खूप फायदेशीर आहेत.  त्वचेमध्ये जमा झालेल्या मृत पेशी आणि पोर्स  स्वच्छ करण्याचा हा सर्वात चांगला आणि नैसर्गिक मार्ग आहे.  अर्धा कप दूध आणि दह्यामध्ये 2 चमचे बेसन मिसळा. त्यात थोडं बेसनही घालू शकता. ते चांगलं मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. ते सुकल्यावर हलक्या हातांनी  घासून घ्या.

हळद आणि दही (curd and termeric)

हळदीच्या अँटीबॅक्टेरीयल (antibacteria ) गुणधर्मांबद्दल सर्वांनाच माहिती आहे.  दही तुमची त्वचा हायड्रेटेड (skin hydration ) ठेवतेच शिवाय अतिरिक्त तेलसुद्धा काढून टाकेल. अर्धा कप लो फॅट दह्यात १ चमचा हळद मिसळा आणि चेहरा आणि मानेला लावा.  20-25 मिनिटे ठेवा आणि स्वच्छ धुवा. (use curd to make skin youthful and look beautiful )

(वरील दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारीत आहे. झी 24 तास या माहितीची कोणतीही खातजमा करत नाही. कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)