World Laughter Day : या '5' कारणांंसाठी 'हसणं' विसरू नका !

'हसवणं' ही एक अवघड कला समजली जाते. 

Updated: May 6, 2018, 03:55 PM IST
World Laughter Day : या '5' कारणांंसाठी 'हसणं' विसरू नका !  title=

मुंबई : 'हसवणं' ही एक अवघड कला समजली जाते. मात्र केवळ कलाक्षेत्राचा भाग म्हणून विनोद आणि हास्य सीमित नसून हसण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. 'लाफ्टर ( हसणं) इज अ बेस्ट मेडिसिन समजले जाते. 6 मे हा दिवस जगभरात हास्य दिन म्हणून साजरा केला जातो. मग पहा या हास्यदिनाची नेमकी सुरूवात कधी आणि कोठून झाली?  

हास्यदिनाची सुरूवात का झाली? 

जगात सर्वात पहिल्यांदा हास्यदिन हा 11 जानेवारी 1998 रोजी साजरा करण्यात आला. मुंबईत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिला हास्य दिवस हा जगात हास्य योग आंदोलनाच्या रूपात साजारा करण्यात आला होता. याचे श्रेय डॉ मदन कटारियांना जाते. 

हास्य योगानुसार, हसण्यामुळे सकारात्मक आणि शक्तिशाली भावना निर्माण होण्यास मदत होते. यामुळे तुमच्यामध्ये अधिक उर्जा निर्माण होते. वातावरणात शांत परिस्थिती निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे जगात सदभावना, शांतता आणि सकारात्मकता निर्माण होईल असा मूळ उद्देश होता. आज जगभरात सहा हजाराहून अधिक हास्य क्लब आहेत. हास्य दिवसाचं औचित्य साधून शहरामध्ये रॅली आणि विविध संमेलनांचं आयोजन केले जाते. 

हसण्याचे 5 आरोग्यदायी फायदे -  

ताणतणाव कमी होतो -  

आजकाल प्रत्येकाचं आयुष्य ताणतणावाचे झाले आहे. हसण्यामुळे काही काळ हा ताणतणाव कमी होण्यास मदत होते. परिणामी रक्तदाबाच्या समस्या कमी होतात. 

सकारात्मकता वाढते  -  
 
मित्रांसोबत क्वालिटी टाईम घालवण्यासाठी आजकाल अनेकांकडे पुरेसा वेळ नाही. त्यामुळे प्रत्येकावरच ताण तणाव वाढलेला असतो. हसण्यामुळे नकारात्मकता कमी होतो. लोकं एकत्र येऊन हसतात. हसण्यामुळे सोशल नेटवर्किंग सुधारते. 

रिलॅक्स पॉईंट अ‍ॅक्टिव्ह राहतात - 

हसण्यामुळे शरीरातील सार्‍या नसा  खेचल्या जातात. यामुळे शरीरातील रिलॅक्स पॉईंट अ‍ॅक्टिव्ह होतात. हसल्यानंतर तुम्हांला आपोआपच रिलॅक्स वाटेल.    

रक्तप्रवाह सुधारतो - 

शरीरात रक्ताची कमतरता असल्याने अनेकांना औषध गोळ्यांच्या मदतीने त्याच्यामध्ये वाढ करावी लागते. हसण्यामुळे शरीरात रक्ताचा बॅलेन्स सुधारण्यास मदत होते. 

अनेक आजारांना ठेवते दूर - 

शरीरात रक्ताचा बॅलेन्स सुधारण्यास मदत होते. सोबतच थायरॉईड, निराशा, घशाचे दुखणे, लठ्ठपणा, अस्थमा, रक्तदाब आणि हृद्याच्या संबंधित काही समस्या असल्यास त्या कमी आटोक्यात ठेवण्यास मदत होते.