फोटो : जगातल्या सगळ्यात ग्लॅमरस अँकरच्या फिटनेसचं रहस्य

मॅक्सिकोची यानेत गार्सिया सध्या चर्चेत आहे.

Updated: Sep 17, 2018, 10:45 PM IST
फोटो : जगातल्या सगळ्यात ग्लॅमरस अँकरच्या फिटनेसचं रहस्य title=

मॅक्सिको : मॅक्सिकोची यानेत गार्सिया सध्या चर्चेत आहे. गार्सियाला जगातली सगळ्यात ग्लॅमरस वेदर अँकर मानलं जातं. गार्सियाच्या या फोटोंमुळे तिचे जगभरात फॅन तयार झाले आहेत. गार्सिया मॅक्सिकोचं टीव्ही स्टेशन टेलीविजा मोंटेरीसाठी वेदर रिपोर्ट देते. मागच्या काही दिवसांमध्ये ती बऱ्याच वेळा चर्चेत आली. इन्स्टाग्रामवर तिने शेअर केलेले फोटो हे त्याचं प्रमुख कारण होतं. या फोटोंमुळे गार्सियाची फॅन फॉलोईंग काही दिवसांमध्येच वाढली.

 Yanet Garcia impland controvercy

यानेत गार्सिया 26 वर्षांची आहे. नियमितता, समर्पण आणि अनुशासनामुळे मी एवढी फिट असल्याचं गार्सिया सांगते. गार्सियाच्या एका फोटोला 5 लाखांपेक्षा जास्त जणांनी लाईक केलं आहे.

Yanet Garcia fitness

इंप्लांट केल्याच्या बातम्यांमुळेही गार्सिया चर्चेत आली होती. पण मी कोणतंच इंप्लांट केलं नाही तर मेहनत आणि अनुशासनामुळे मी या फिटनेसपर्यंत पोहोचले, असं गार्सिया म्हणाली होती.

 Yanet Garcia in Gym

यानेत गार्सिया अनेक वेळा तिचे जिममधले फोटोही शेअर करते. गार्सियाच्या या फोटोंना लाखांच्या वर लाईक्स मिळतात.

Yanet Garcia Fitness journey

8 वर्षांपूर्वी मी जिमला जायचा निर्णय घेतला. त्यावेळी मी प्रमाणापेक्षा जास्त बारीक होते. मला माहिती होतं की मी यापेक्षा जास्त सुंदर दिसू शकते. तेव्हापासूनच माझी फिटनेससाठीची मेहनत सुरू झाली, असं वक्तव्य गार्सियानं केलं आहे.

Yanet Garcia model

एवढं फिट आणि ग्लॅमरस होणं नक्कीच सोपं नव्हतं, पण मी ते करून दाखवलं, अशी प्रतिक्रिया गार्सियानं दिली. यानेट गार्सिया टीव्हीवर वेदर अँकर बनण्याआधी मॉडेल होती. पण आधीपासूनच मला अँकर व्हायचं होतं. अँकर होणं माझं स्वप्न होतं, असं गार्सिया सांगते.

magazine praise Yanet Garcia

गार्सिया ही अशी वेदर अँकर आहे जिच्यामुळे तुम्ही हमखास हवामानाचा अंदाज बघता, असं कौतुक अमेरिकेच्या एका मॅगझिननं केलं आहे.

Yanet Garcia instagram

जगातल्या या सगळ्यात सुंदर वेदर अँकरचे फक्त इन्स्टाग्रामवरच 74 लाख फॉलोअर्स आहेत.

Yanet Garcia mum

गेल्या अनेक वर्षांपासून फिट होण्यासाठी गार्सियानं प्रचंड मेहनत घेतल्याचं तिच्या पर्सनल ट्रेनरनं सांगितलं. गार्सिया दोन मुलांची आई आहे हे तिच्या फिटनेसकडे बघून कोणीही ओळखू शकणार नाही.

no zunk food

यानेत गार्सियाचं डाएटही तेवढंच कठीण होतं. गार्सियानं गेल्या कित्येक वर्षांमध्ये जंक फूड, केक आणि चॉकलेटला हातही लावलेला नाही.