थांबा! तुमची दररोजची 'ही' सवय ठरू शकते जीवघेणी; नव्या अभ्यासातून समोर!

केवळ न्यूरोलॉजिकल सिस्टीमसाठीच फायदेशीर ठरत नाही तर मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी देखील हे प्रभावी आहे.

Updated: Feb 18, 2023, 09:27 PM IST
थांबा! तुमची दररोजची 'ही' सवय ठरू शकते जीवघेणी; नव्या अभ्यासातून समोर! title=

Insomnia Problem : खाणं आणि पाण्यासोबत व्यक्तीला झोप (Sleep) देखील तितकीच महत्त्वाची असते. नेहमी तज्ज्ञ देखील पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देत असतात. तर आता याचसंदर्भात एक घाबरवून टाकणारा अभ्यास समोर आला आहे. या अहवालानुसार, ज्या व्यक्तींना निद्रानाशाचा (Insomnia) त्रास आहे त्यांना डिमेंशियाचा (Dementia) धोका वाढतो. इतकंच नाही तर पुरेशी झोप न मिळाल्यामुळे अशी अनेक कारणं देखील आहेत ज्यामुळे व्यक्तीचा अकाली मृत्यू (Sudden death) होऊ शकतो.

हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील मेडिसिन इंस्ट्रक्टर रेबेका रॉबिन्सन यांच्या म्हणण्याप्रमाणे, या अभ्यासामध्ये समोर आलेल्या पुराव्यांवरून असं दिसून येतंय की रात्रीची झोप आपल्या आयुष्यासाठी किती महत्त्वाची असते. हे केवळ आपल्या न्यूरोलॉजिकल सिस्टीमसाठीच फायदेशीर ठरत नाही तर मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी देखील हे प्रभावी आहे.

कमी झोप आरोग्यासाठी धोकादायक

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, अमेरिकेसोबत जगभरात लोकांच्या मनात झोप, डिमेंशिया आणि इतर कारणांनी लवकर मृत्यू होण्याच्या मधील संबंध एक मोठा चिंतेचा विषय आहे. 'वर्ल्ड स्लीप सोसायटी'च्या मते, कमी झोप येणं जगभरात 45 टक्के लोकसंख्येच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

झोपेच्या समस्या नोंदवलेल्या सहभागींच्या अहवालांचा संबंध त्यांच्या वैद्यकीय नोंदीशी जोडण्यात आला. अभ्यासानुसार असं आढळलं आहे की, जवळजवळ दर रात्री झोपेसंबंधी समस्या अनुभवणार्‍या 44 टक्के लोकांना इतर कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका असतो. तर बहुतेक प्रमाणात या समस्येचा त्रास असलेल्या 56 टक्के लोकांना लवकर मृत्यूचा धोका असतो.

सामान्यपणे माणसाने दररोज 7 ते 10 तासांची झोप घेतली पाहिजे. मात्र अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिवेंशन यांच्या म्हणण्याप्रमाणे, अमेरिकेतील प्रत्येक तिसरा व्यक्ती या झोपण्याच्या पॅटर्नला फॉलो करत नाही.

अहवालानुसार अमेरिकेत सुमारे 5 ते 7 करोड लोक स्लीप डिसॉर्डर, स्लीप एपनिया, इंसोमेनिया और रेस्टलेस लेग सिंड्रोम यांसारख्या समस्यांनी ग्रस्त आहेत. सीडीसीच्या सांगण्यानुसार, झोपेशी निगडीत ही समस्या मधुमेहाशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे स्ट्रोक, हृदयासंबंधीचे आजार आणि डिमेंशिया यांच्याशी देखील संबंध दिसून येतो. 

(टीप- ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची झी 24 तास पुष्टी करत नाही. कोणतेही उपाय करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)