२० वर्षाच्या अन्नामने पेन्सिलीवर कोरलं 'महाभारत'

अन्नाम महिता या 20 वर्षांच्या तरुणीने महाभारतातील श्लाेकांमधील 67 हजार 230 अक्षरे पेन्सिलींच्या टाेकांवर काेरली आहेत.

Updated: May 25, 2022, 05:11 PM IST
२० वर्षाच्या अन्नामने पेन्सिलीवर कोरलं 'महाभारत' title=

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशमधील चिराला मंडल येथल्या स्वर्ण गावात अन्नाम महिता हीच जन्म झाला. लहानपणापासूनच तिला अभ्यासात रुची नव्हती. अभ्यास करायला तिला कंटाळा यायचा. तिच्या अंगात कला असल्याचं तिच्या बावळा आणि शिक्षकांना दिसून आलं.

त्यांनी अन्नाम हिला खडूवर लघुचित्र काढण्याचा सल्ला दिला. तिचीही या कलेतील आवड वाढत गेली आणि तिने त्या कलेचा सराव सुरु केला. खडूसह पेन्सिल, तांदूळ आणि अन्य धान्ये यांच्यावर चित्र काढण्याचा ती सराव करू लागली. या वस्तूंवर तिने गणपती, विविध देशांचे झेंडे, पक्षी, प्राणी यांची चित्रे काढली.

अन्नाम हिची माहिती हळूहळू अन्य गावात पोहोचू लागली आणि तिला मिनिएचर आर्टिस्ट म्हणून ओळखण्यात येऊ लागलं. तरीही तिने बीकाॅमपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. तिला सरकारी नाेकरी करण्याची इच्छा आहे.

पेन्सिलीच्या टाेकावर किंवा धान्यावर काेरीव काम करण्यासाठी अत्यंत एकाग्रता लागते. या कलेमुळे मी आता अनेक तास एकाच जागेवर बसून माझा अभ्यास करू शकते. जर काेणी मला सल्ला मागितला, तर मी मला माझ्या शिक्षकांनी पूर्वी जाे सल्ला दिला हाेता, ताेच सल्ला देईन, असे अन्नाम सांगते.

याच एकाग्रतेच्या आधारावर अन्नाम हिने महाभारतातील श्लाेकांची 67 हजार 230 अक्षरे 810 पेन्सिलींच्या टाेकांवर काेरली आहेत. त्यानंतर तिने आपले लक्ष्य कुराण आणि बायबलवर केंद्रित केले आहे. कुराण आणि बायबलमधील श्लाेक याच लघुकलेच्या माध्यमातून लिहून गिनिस बुकमध्ये आपले नाव नाेंदवण्याचे तिचे प्रयत्न सुरू आहेत.