जम्मू काश्मीर : अनंतनागमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु...

Updated: Jun 29, 2020, 08:14 AM IST
जम्मू काश्मीर : अनंतनागमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा title=
संग्रहित फोटो

श्रीनगर : अनंतनाग जिल्ह्यातील खलचोरा रुनीपोरा भागात सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. या दहशतवाद्यांची ओळख अद्याप झालेली नाही. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून एक AK-47 आणि 2 पिस्तुल ताब्यात घेण्यात आले आहेत. सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. जून महिन्यात झालेल्या 13 चकमकींमध्ये 41 दहशवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

हिज्बुल मुजाहिद्दीन सुरक्षा दलाला निशाणा बनवत आहे. सर्व दहशतवादी संघटनांपैकी हिज्बुलचे बहुतेक दहशतवादी ठार झाले असून जम्मू-काश्मीरमधील त्राल हा भाग आता हिज्बुलमुक्त झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. हा भाग 1989 पासून हिज्बुल केंद्र बनल्याचंही सांगण्यात येत आहे.