पाहा सत्य काय? सोशल नेटवर्किंगवर व्हायरल 'साडेतीनशे'ची नोट

नोटबंदीनंतर आरबीआयकडून २ हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 16, 2017, 05:13 PM IST
पाहा सत्य काय? सोशल नेटवर्किंगवर व्हायरल 'साडेतीनशे'ची नोट title=

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर आरबीआयकडून २ हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या. या नंतर आरबीआयने नगदी नोटांची चणचण भासल्यानंतर, २०० रूपये आणि ५० रूपयांची देखील नोट जारी केली.

या आधी हजार रूपयांचा मेसेज

मागील काही दिवसांपूर्वी व्हॉटस अॅपवर आलं होतं की, आरबीआय सप्टेंबर महिन्यात हजार रूपयांची नोट जारी करणार आहे. मात्र या विषयी आरबीआयने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

३५० रूपयांची नोट व्हायरल

या दरम्यान सोशल मीडियावर ३५० रूपयांची नोट व्हायरल होत आहे. हा फोटो तुम्ही व्हॉटस अॅपवरही पाहिला असेल. यामुळे लोकांना असा प्रश्न पडतोय की, सरकार खरोखर सरकार अशी साडेतीनशे रूपयांची नोट आणणार आहे.

३५० रूपयाच्या नोटेचा फोटो

फेसबुक आणि व्हॉटसअॅपवर मागील काही दिवसापासून ३५० रूपयाच्या नोटेचा फोटो, व्हायरल होत आहे. मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, आरबीआय लवकरच अशी नोट जारी करणार आहे.

फोटोत या नोटेचा रंग लाल

फोटोत या नोटेचा रंग लाल दिसून येत आहे. या फोटोची पडताळणी करण्यात आल्यावर हा फोटो बनावट असल्याचं समोर आलं आहे. मात्र अजून समजू शकलेलं नाही की, अशा अफवा कोण पसरवत आहे.

जर तुमच्याकडे असा मेसेज आला

मात्र लोकांनी कोणत्याही सत्यतेची पडताळणी न करता, ते असे मेसेज आपल्या, मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवत आहेत. जर तुमच्याकडे असा मेसेज आला, तर याकडे दुर्लक्षच केलेलं बरं.

२० रूपयांची नोट जारी करण्याचा दावा

काही मेसेजेसमध्ये २० रूपयांची नोट जारी करण्याचा दावा करण्यात आला आहे, २० रूपयाच्या नोटेचा रंग ५० रूपयाच्या नोटेसारखा आहे. याशिवाय आरबीआयने मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या ५० आणि ५०० रूपयांच्या नोटेचं नवीन डिझाईन केलं आहे.

आरबीआयने अशी कोणतीही नोट आणलेली नाही

आरबीआयने ३५० रूपयांची नोट जारी करण्याविषयी कोणतीही घोषणा केलेली नाही, तसेच व्हॉटसअॅपवर व्हायरल होणाऱ्या,  नोटेविषयी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.