नोटबंदीनंतर १००० रुपयांचे ८.९ करोड नोटा कुठे झाल्या गायब?

नोटाबंदीनंतर जुन्या १००० रुपयांच्या एकूण ६३२.६ करोड नोटांपैंकी ८.९ करोड नोटा आत्तापर्यंत परत आलेल्या नाहीत, अशी धक्कादायक माहिती आज आरबीआयनं जाहीर केलीय. 

Updated: Aug 30, 2017, 06:55 PM IST
नोटबंदीनंतर १००० रुपयांचे ८.९ करोड नोटा कुठे झाल्या गायब? title=

मुंबई : नोटाबंदीनंतर जुन्या १००० रुपयांच्या एकूण ६३२.६ करोड नोटांपैंकी ८.९ करोड नोटा आत्तापर्यंत परत आलेल्या नाहीत, अशी धक्कादायक माहिती आज आरबीआयनं जाहीर केलीय. 

भारताची सर्वोच्च बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीनंतर नव्या नोटांच्या छपाईसहीत २०१६-१७ मध्ये एकूण नोटांची रक्कम दुप्पट होऊन ७९६५ करोड रुपये झालीय. २०१५-१६ मध्ये ही रक्कम ३४२१ करोड रुपये होती.

यासोबतच, २०१६-१७ मध्ये ७.६२ लाख तर २०१५-१६ मध्ये ६.३२ लाख  नकली नोटांची माहिती मिळाल्याचं आरबीआयनं म्हटलंय. 

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लागू करण्यात आलेल्या नोटाबंदी दरम्यान देशातील चलनात राहिलेल्या १५.४४ लाख करोड रुपयांच्या बंदी घालण्यात आलेल्या नोटांपैंकी १५.२८ लाख करोड रुपये आरबीआयकडे जमा करण्यात आल्यात.