अपघातातील जखमींच्या मदतीसाठी गेलेल्या सात जणांचा अपघातात मृत्यू

मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 14, 2017, 11:55 PM IST
अपघातातील जखमींच्या मदतीसाठी गेलेल्या सात जणांचा अपघातात मृत्यू  title=
Representative Image

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

बैतूल जिल्ह्यात दोन दुचाकींची धडक झाली. या अपघातात जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी स्थानिकांनी धाव घेतली. मात्र, त्याच दरम्यान जवळून जाणारा डंपर पलटी झाला आणि मोठा अपघात घडला. 

बोरदेही-मुलताई मार्गावर नागपुरहून येणाऱ्या दोन बाईकची टक्कर झाली. दुचाकींचा अपघात झाल्याने स्थानिकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. यावेळी रस्त्याने जाणारा डंपर पलटी झाला आणि त्यामुळे ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर, दोनजण जखमी झाले आहेत.

ब्रह्मणवाडा जवळ हा अफघात झाला. डंपर अंगावर कोसळल्याने त्याखाली दबून सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन जखमींना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

यानंतर जेसीबी मशीनच्या सहाय्याने डंपर हटविण्यात आला आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतकांमध्ये तीनजण हे नागपुरचे निवासी आहेत.