४ वर्षात आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत ८० टक्क्यांनी वाढ

महाराष्ट्रातली जनता सर्वोच्च स्थानी

Updated: Oct 23, 2018, 02:46 PM IST
४ वर्षात आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत ८० टक्क्यांनी वाढ title=

नवी दिल्ली : गेल्या ४ वर्षात आयकर भरणाऱ्या नागरिकांच्या संख्येत तब्बल ८० टक्के वाढ झाली आहे. अभिमानास्पद बाब म्हणजे प्रामाणिकपणे आयकर भरणाऱ्यांत देशात महाराष्ट्रातली जनता ही सर्वोच्च स्थानी आहे. 

२०१७-१८ मध्ये महाराष्ट्राची आकडेवारी देशात सर्वोत्तम म्हणजे ३८.३ टक्के इतकी होती. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या दिल्लीची आकडेवारी १३.७ टक्के इतकी आहे. सर्वात कमी करदाते पंतप्रधानांच्या गुजरातमध्ये आहेत. 

गुजरातची आकडेवारी अवघी साडेचार टक्के आहे. २०१३-१४ मध्ये देशात ३ कोटी ७९ लाख कोटी आयकर परतावा भरला गेला तर २०१७-१८ मध्ये त्यात भर होऊन तब्बल ६ कोटी ८५ लाख आयकर परतावे भरले गेले. 

केंद्र सरकारने काळा पैसा आणि करचोरीविरोधात सुरू केलेल्या अभियानाचे हे फायदे दिसत आहेत. या अभियानामुळे कर्नाटक, तामीळनाडू आणि गुजरातमध्येही कर भरणाऱ्यांची संख्या वाढायला लागलीय. तर राजस्थानात ही वाढ सर्वाधिक आहे.