यमुना नदीत बोट उलटली, १५ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात यमुना नदीत बोट उलटून मोठी दुर्घटना झाली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 14, 2017, 11:02 AM IST
यमुना नदीत बोट उलटली, १५ जणांचा मृत्यू
Image: ANI

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात यमुना नदीत बोट उलटून मोठी दुर्घटना झाली आहे.

यमुना नदीत बोट उलटल्याने १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ जणांना वाचविण्यात यश आलं आहे. त्यांना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बागपतजवळ यमुना नदीत गुरुवारी सकाळी बोट उलटली. या बोटमधून ६० जण प्रवास करत होते. मात्र, बोटची क्षमाता केवळ १० ते १५ जणांचीच होती. बोटीतून क्षमतेहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचं बोललं जात आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थ, पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले. बचावकार्य सुरू असून बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात येत आहे.