Share Market: शेअर मार्केटच्या तेजीला ब्रेक? सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चढउतार

शेअर बाजारातील (Share Market) तेजीला सध्या ब्रेक लागला आहे. सोमवारी बाजारात मोठी घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सचीही विक्री झाली

Updated: Aug 23, 2022, 10:39 AM IST
Share Market: शेअर मार्केटच्या तेजीला ब्रेक? सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चढउतार title=

Share Market : आठवड्याची सुरवात मोठ्या अंकाच्या घसरणीसह सुरू झाली आहे. कालचा दिवस शेअर बाजारासाठी 'ब्लॅक मंडे' ठरला होता. मात्र आज पण शेअर मार्केटच्या पहिल्या सत्राची सुरवात अस्थिरतेसह झाली. 

दरम्यान शेअर बाजारातील (Share Market) तेजीला सध्या ब्रेक लागला आहे. सोमवारी बाजारात मोठी घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सचीही विक्री झाली. मेटल, रिअॅल्टी आणि ऑटो शेअर्सना सर्वाधिक फटका बसला. आयटी, फार्मा, इंफ्रा शेअर्सवर दबाव होता. 

आज शेअर बाजार सुरू होताना सेन्सेक्समध्ये 56 अंकांची घसरण झाली होती तो 58,771 अंकांनी सुरू झाला. पण काही वेळातच बाजारात चढउतार दिसून येत आहे तर निफ्टीमध्ये 2 अंकांची घसरण होऊन तो 17,492 अंकांवर सुरू झाला होता काही वेळात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चढउतार दिसून आला आहे. त्यामुळे आज सर्वांच लक्ष शेअर बाजारावर राहील. 

तर काल (22 ऑगस्ट) शेअर बाजारात सेन्सेक्स 872 अंकांनी घसरला होता, तर निफ्टी 268 अंकांनी घसरला होता. सलग दोन सत्रांत शेअर बाजारात घसरण झाल्याने त्याचा फटका गुंतवणूकदारांना बसला होता.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

टाटा स्टील (TATASTEEL)

टाटा मोटर्स (TATAMOTORS)

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

डिविस लॅब (DIVISLAB)

ट्रेंट (TRENT)

गोदरेज प्रॉपर्टींज (GODREJPROP)

अशोक लेलँड (ASHOKLEY)

व्होल्टास (VOLTAS)

आयआरसीटीसी (IRCTC)