'मला लग्न करायचंय', 11 मुलं आणि 34 नातवंडं असतानाही 95 वर्षीय आजोबांनी केलं दुसरं लग्न, लेकानेच शोधली मुलगी

95 Year Old Man Second Marriage: पाकिस्तानात एका व्यक्तीने केलेल्या दुसऱ्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. याचं कारण या व्यक्तीचं वय तब्बल 95 वर्षं आहे. जकारिया असं या व्यक्तीचं नाव असून 2011 मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. विशेष म्हणजे त्यांना 6 मुलं आणि 5 मुली आहेत. त्यांची नातवंड आणि नातवंडांची मुलं पकडून एकूण 90 जण आहेत.   

शिवराज यादव | Updated: Aug 7, 2023, 12:36 PM IST
'मला लग्न करायचंय', 11 मुलं आणि 34 नातवंडं असतानाही 95 वर्षीय आजोबांनी केलं दुसरं लग्न, लेकानेच शोधली मुलगी title=

95 Year Old Man Second Marriage: पाकिस्तानात एका व्यक्तीने केलेल्या दुसऱ्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. याचं कारण आधीच 6 मुलं आणि 5 मुलांचा बाप असणाऱ्या या व्यक्तीचं वय तब्बल 95 वर्षं आहे. मोहम्मद झकारिया ((Muhammad Zakaria) असं या व्यक्तीचं नाव असून 2011 मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यांची नातवंड आणि नातवंडांची मुलं पकडून एकूण 90 जण आहेत. पण यानंतरही त्यांना दुसरं लग्न करण्याची इच्छा होती. विशेष म्हणजे, त्यांच्या लेकानेच त्यांचं धुमधडाक्यात लग्न लावून दिलं. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. 

उत्तर-पश्चिम पाकिस्तानच्या मानसेहरा (Mansehra) शहरात राहणारे जकारिया यांनी पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर 12 वर्षांनी दुसरं लग्न केलं आहे. मोहम्मद झकारिया यांच्या लग्नाला त्यांची 11 मुलं आणि 34 नातवंड, पणतू उपस्थित होते. मोहम्मद झकारिया यांच्या पहिल्या पत्नीचं 2011 मध्ये निधन झालं होतं. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा लग्न करत नवा साथादीर हवा असल्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर बऱ्याच काळापासून त्यांच्यासाठी मुलीचा शोध घेतला जात होता. 

पाकिस्तानच्या ‘आज न्यूज’ने (Aaj News) यासंदर्भात वृत्त दिलं आहे.  त्यात दिलेल्या माहितीनुसार खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) प्रांतातील मानसेहरा येथील वयस्कर व्यक्ती मोहम्मद झकारिया यांना 6 मुलं आणि 5 मुली आहेत. याशिवाय त्यांची नातवंडं आणि पणतू यांची संख्या पाहिली तर ती 90 पेक्षा जास्त आहे. 

झकारिया यांना दुसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली असता, त्यांच्या अनेक मुलांनी विरोध केला. पण त्यांचा लहान मुलगा वकार तनोलीने मात्र त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आपल्या वडिलांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये पत्नीचं प्रेम मिळालं पाहिजे असं वकारला वाटत होतं. यामुळे त्याने आपल्या वडिलांसाठी जोडीदार शोधण्याचा निर्णय घेतला. 

पाकिस्तानातील 'समा टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, चांगलं आरोग्य आणि संतुलित आयुष्य घालवत असल्याने मोहम्मद झकारिया प्रसिद्द असून, संपर्ण कुटुंबासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातील काही सवयी सांगितल्या आहेत, ज्यामुळे ते निरोगी आयुष्य जगत आहेत. ते सांगतात की, त्यांनी कधीच शेतातील गोष्टींचं थेट सेवन केलं नाही. कधीच ते थंड पाणी प्यायले नाहीत. शिळ्या अन्नालाही त्यांनी कधी हात लावला नाही.  

मोहम्मद झकारिया यांना निकाह स्थानिक मौलवी मौलाना गुलाम मुर्तजा यांनी एका कार्यक्रमात लावला. या निकाहला कुटुंबातील सर्व सदस्यांनी उपस्थिती लावली. अत्यंत थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नात कुटुंबातील सदस्य तसंच नातेवाईक आणि पाहुण्यांनी हजेरी लावली. 95 वर्षीय मोहम्मद झकारिया यांची पत्नी सराय आलमगीर येथील असल्याची माहिती आहे.