'जर 10 लोक एकाच माणसाविरोधात एकवटत असतील, तर सांगा खरा शक्तीशाली कोण?' रजनीकांतचं मोदींना समर्थन

तमिळचा सूपरस्टार रजनीकांतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली आहे. रजनीकांत यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.

Updated: Nov 13, 2018, 05:02 PM IST
 'जर 10 लोक एकाच माणसाविरोधात एकवटत असतील, तर सांगा खरा शक्तीशाली कोण?' रजनीकांतचं मोदींना समर्थन title=

चेन्नई : तमिळचा सूपरस्टार रजनीकांतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली आहे. रजनीकांत यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. रजनीकांत यांना मोदीविरोधी बनवत असलेल्या महाआघाडीविषयी प्रश्न विचारल्यानंतर रजनीकांतने नरेंद्र मोदी यांचं समर्थन करणारं असं काही वक्तव्य केलं की, सर्व अवाक झाले. मोदी विरोधक महाआघाडी बनवण्याची शक्यता वर्तवली जात आहे, या विषयी रजनीकांत यांना प्रश्न विचारला गेला होता.

पत्रकारांनी जेव्हा रजनीकांत यांना मोदी विरोधक महाआघाडी बनवतील अशी शक्यता आहे, असा प्रश्न विचारला. 

यावर प्रश्नावर उत्तर देताना रजीनकांत म्हणाला, 'जर एखाद्या माणसाविरोधात 10 जण एकवटत असतील? तर तुम्ही कुणाला शक्तिशाली म्हणाल? जर 10 लोकांपैकी एकाविरोधातच युद्ध पुकारलं असेल, तर खरा शक्तिशाली कोण आहे?', असा सवाल यावेळी रजनीकांतने केला.

दरम्यान 2019 लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, सोमवारी रजनीकांतला महाआघाडीविषयी विचारण्यात आलं होतं, त्यावर आपल्या वक्तव्यात रजनीकांतने समीकरण आणखी गुंतागुंतीचं करून टाकलं होतं.

त्यासंदर्भात त्याने मंगळवारी स्पष्टीकरण दिलं, त्यावेळी 10 लोक ज्याच्या विरोधात एकत्र होत आहे, तर खरा शक्तिशाली कोण असा सवाल रजनीकांतने केला आहे.

यावेळी त्यांना विचारण्यात आलं होत, देशात भाजपविरोधात महाआघाडी, भाजपसाठी एक धोकायदायक परिस्थिती निर्माण करेल असं सांगितलं जात आहे.

यावर रजनीकांत म्हणाला होता, 'जर विरोधी पक्षाला असं वाटत असेल की, महाआघाडी भाजपसाठी धोकादायक आहे, तर तसं वाटणं ते त्यांच्यासाठी असेल'.

तामिळनाडूत भाजप पाय रोवण्याचे प्रयत्न करीत आहे. तामिळनाडूच्या राजकीय आघाडीत याआधीच समीकरणं जुळवली जात आहेत की, रजनीकांत हे भाजपसोबत जातील. 

रजनीकांतचं हे वक्तव्य भाजपसाठी नवी आशा निर्माण करणारं आहे.

एआयएडीएमके आणि भाजपसोबत आघाडीची चर्चा

रजनीकांत राजकारणात उतरण्याआधी असे अंदाज बांधले जात होते की, रजनीकांत यांच्या पक्षाची युती भाजप किंवा अन्नाद्रमुक यांच्यासोबत करतील. 

सध्या अन्नाद्रमुककडे कोणताही चेहरा नाही. दुसरीकडे रजनीकांतकडे पक्षबांधणीचं आव्हान आहे. 

भाजपाकडे देखील कोणताही मोठा चेहरा नाही. अशावेळी रजनीकांत येथे महाआघाडीचा मोठा चेहरा म्हणून पुढे येऊ शकतात.