CBSEच्या नंतर CISCE आणि हरियाणा बोर्डानेही बारावीच्या परीक्षा केल्या रद्द

मंगळवारी बारावीच्या परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.   

Updated: Jun 2, 2021, 10:20 AM IST
CBSEच्या नंतर CISCE आणि हरियाणा बोर्डानेही बारावीच्या परीक्षा केल्या रद्द  title=

मुंबई : बारावीच्या परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. CBSEच्या नंतर CISCE आणि हरियाणा बोर्डानेही बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत CISCEने 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. CISCEने 12वीच्या परीक्षारद्द केल्याची माहिती बोर्ड अध्यक्ष डॉ. जी इमैनुएल यांनी दिली आहे. CISCEने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

डॉ. जी इमैनुएल म्हणाले, 'परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. वैकल्पिक मूल्यांकन लवकरच जाहीर केली जातील..' CBSEच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर काउंसिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन्स (CISCE) ने देखील 12वी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 12 बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत सीबीएसईचे अध्यक्ष, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.