Repo rate वाढीचा मोठा परिणाम, 'या' बँकानी वाढवलं कर्ज, तुमचा EMI महागणार...

आता भर म्हणून ICICI आणि PNB बँकने कर्जदरातही मोठी वाढ केली आहे. 

Updated: Aug 6, 2022, 05:24 PM IST
Repo rate वाढीचा मोठा परिणाम, 'या' बँकानी वाढवलं कर्ज, तुमचा EMI महागणार... title=

Repo Rate and Interest Rates: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने चलनविषयक पुनरावलोकन धोरणा (Montetary Review Policy) च्या बैठकीत नुकतेच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या बैठकीतून समोर आलेल्या माहितीनूसार RBI ने रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. या महत्त्वपुर्ण घोषणेनंतर नागरिकांवरील EMI चा भार आता वाढणार आहे पण त्यातच आता भर म्हणून ICICI आणि PNB बँकने कर्जदरातही मोठी वाढ केली आहे. 

RBI ने Repo rate 0.50 टक्क्यांनी वाढवून 5.40 टक्के इतका केला आहे. मे महिन्यानंतरची ही तिसरी वाढ आहे. या वाढीसोबतच Repo rate किंवा अल्प-मुदतीच्या कर्ज दराने (Short-term loan rates) तर 5.15 टक्‍क्‍यांची पातळी ओलांडली आहे.

PNB आणि ICICI बँकेची घोषणा, व्याजदारत वाढ 
व्यावसायिक बँका फक्त Repo rate ने केंद्रीय बँकेकडून कर्ज घेतात. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने standard व्याजदर (interest rate) 0.50 टक्क्यांनी वाढवल्यानंतर ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँकेनेही कर्जदरात वाढ केली आहे. RBI ने शुक्रवारी व्याजदरात 0.5 टक्क्यांनी वाढ केली. Repo rate 5.40 टक्क्यांनी वाढवला. ICICI बँकेने आपल्या पत्रकात म्हटले आहे की ICICI बँक I-EBLR (External Benchmark Based Lending Rates) हा 9.10 टक्के per year राहणार आहे आणि दरमहा तो भरणे (payable) आवश्यक राहील, जो 5 ऑगस्ट 2022 पासून लागू होईल.  

ICICI सोबतच पंजाब नॅशनल बँकेनेही कर्जदर वाढवले ​​आहेत. RBI ने Repo rate मध्ये वाढ केल्यानंतर रेपो लेंडिंग रेट (RLLR) देखील 7.40 टक्क्यांवरून 7.90 टक्क्यांवर 8 ऑगस्ट 2022 पासून लागू करण्यात आला आहे. यासोबतच वाढलेल्या EMI मुळे लोकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.