अखिलेश यादव यांचा दावा, 'रोज रात्री भगवान कृष्ण येतात आणि फक्त एकच सांगतात....'

सगळ्यांसमोर बोलताना अखिलेश यादव यांनी दावा केला.

Updated: Jan 4, 2022, 02:38 PM IST
अखिलेश यादव यांचा दावा, 'रोज रात्री भगवान कृष्ण येतात आणि फक्त एकच सांगतात....' title=

लखनऊ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष (Samajwadi Party) आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी सोमवारी सांगितले की, समाजवादाचा मार्ग हाच खरे तर रामराज्याचा मार्ग आहे. तेव्हा सगळ्यांसमोर बोलताना अखिलेश यादव यांनी दावा केला की, भगवान कृष्ण रोज रात्री त्यांच्या स्वप्नात येतात आणि म्हणतात की, समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे.

भगवान श्रीकृष्ण अखिलेशला स्वप्नात काय म्हणाले?

अखिलेश यादव म्हणाले, "भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नातही येतात आणि कालही आले होते, ते रोज येतात आणि म्हणतात की, लवकरच समाजवादी सरकार स्थापन होणार आहे."

पुढे अखिलेश यादव म्हणाले की, भाजप अनेकदा रामराज्याची चर्चा करते पण प्रत्यक्षात समाजवादाचा मार्ग हाच रामराज्याचा मार्ग आहे. ज्या दिवसापासून समाजवाद पूर्णपणे लागू होईल त्या दिवसापासून रामराज्य सुरू होईल.

सीएम योगींवर साधला निशाणा

त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधत सपाचे सुप्रीमो अखिलेश यादव म्हणाले की, 'ज्यांच्यावर सर्व गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यांनाच भाजपने मुख्यमंत्री केले. भाजपचे अनेक नेते जे वयोवृद्ध आहेत, जे अनेक वर्षे रक्त आणि घाम गाळून पक्ष मजबूत करत होते, ते अनेकवेळा म्हणतात की, आम्ही येथे दिवसरात्र एक करुन घाम गाळत होते, ते कुठून आले माहीत नाही, त्यांना आणून आमच्यावर बसवले गेले आहे.'

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानसभा निवडणूक लढवल्याबद्दल बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, 'जेव्हा ते जनतेमध्ये जातील तेव्हा त्यांना विचारले जाईल की, रोजगार आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह सर्व आश्वासने का पूर्ण झाले नाहीत? प्रत्येकाला माहित असेलच की जेव्हा एखादा मुलगा परीक्षेत नापास होतो, तेव्हा कधी त्याचे आई-वडील, काकाही त्याला थोडी कॉपी करायला सांगतात. तसेच आमच्या मुख्यमंत्र्यांचे आहे. ते अपयशी ठरले आहेत. आता त्यांना कोणीही उत्तीर्ण करू शकणार नाही आणि जे उत्तीर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील आता त्यांनाही उत्तीर्ण करता येणार नाही.'

स्वत:च्या विधानसभा निवडणूकी विषयी बोलताना अखिलेश यादव यांनी सांगितले की, पक्ष सांगेल तिथूनच मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे.