बापरे ! कोरोनाची त्सुनामी, सगळे विक्रम मोडले; पहिल्यांदाच 2000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

कोरोनाचा देशात हाहाकार दिसून येत आहे.  (Cornavirus in India) कोरोना त्सुनामीने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.  

Updated: Apr 21, 2021, 08:19 AM IST
बापरे ! कोरोनाची त्सुनामी, सगळे विक्रम मोडले; पहिल्यांदाच 2000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू title=
संग्रहित फोटो

 मुंबई :  कोरोनाचा देशात हाहाकार दिसून येत आहे.  (Cornavirus in India) कोरोना त्सुनामीने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. पहिल्यांदा एका दिवसात 2 हजाराहून अधिक लोक मरण (Covid-19 Death) पावले आहेत. यामुळे मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला घराबाहेर पडू नका, नियम पाळा, असे आवाहन केले आहे. त्याचवेळी लॉडकडाऊनचे संकेत दिले आहेत. तर महाराष्ट्रातही कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढल्याने आज रात्रीपासून कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अनेक ठिकाणी रुग्णसंख्या जास्त असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. औषधाबरोबर बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे.

भारतात कोरोनाव्हायरसमुळे  (Cornavirus in India) परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे आणि नवीन प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, भारतात कोविड -19मधील मृत्यूमुळे  (Covid-19 Death)आतापर्यंतच्या सर्व विक्रम मागे पडले आहेत आणि  नवीन कोरोना बाधितांचा आकडा जवळपास तीन लाखांच्या घरात पोहोचला आहे. कोरोना साथीच्या रोगाच्या प्रारंभापासून एका दिवसात प्रथमच 2 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

2.94 लाख नवीन रुग्ण आणि 2000हून अधिक मृत्यू

WorldMeterच्या मते, गेल्या 24 तासांत भारतात 2 लाख 94 हजार 115 लोकांना कोरोनाव्हायरसची (Coronavirus)लागण झाली आहे, तर यावेळी 2020 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, भारतात कोरोनाची लागण होणारी एकूण संख्या 1 कोटी 56 लाख 9 हजार 4 वर गेली आहे आणि 1 लाख 82 हजार 570 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोविड -19मधील सक्रिय रुग्णांची संख्या 21लाख 50 लाख119 वर पोहोचली आहे, जी संक्रमित लोकांच्या एकूण संख्येच्या 13.8 टक्के आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर 85 टक्क्यांपर्यंत खाली 

आकडेवारीनुसार कोविड -19मधून बरे होणाऱ्यांची संख्या वाढून 1 कोटी 32 लाख 69 हजार 863 झाली आहे. भारतात कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमध्ये वाढ झाल्याने बरे होण्याचेही प्रमाण कमी झाले आहे आणि ते 85 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. कोरोनामुळे राष्ट्रीयस्तरावर मृतांची संख्या वाढून 1.2 टक्के झाली आहे. मृत्यूचे प्रमाण महाराष्ट्रात 1.5 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये 1.6 टक्के आहे.

एका आठवड्यात मृत्यूची संख्या दुप्पट वाढली

तारीख 24 तासात कोरोनाने मृत्यू
14 एप्रिल 1025
15 एप्रिल 1038
16 एप्रिल 1184
17 एप्रिल 1338
18 एप्रिल 1498
19 एप्रिल 1620
20 एप्रिल 1761
21 एप्रिल 2020
 

10 राज्यांत 77 टक्के पेक्षा जास्त रुग्णसंख्येची नोंद  

देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या एकूण  77.67 टक्के प्रकरणे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह 10 राज्यांमधील आहेत. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की देशात संसर्ग होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे आणि सध्या ते 15.99 टक्के आहे. कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या नवीन राज्यांपैकी 77.67 टक्के प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.