अनिल अंबानी यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या

देशाबाहेर पडण्याची परवानगी न देण्यासाठी याचिका

Updated: Oct 3, 2018, 09:44 AM IST
अनिल अंबानी यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या title=

मुंबई : राफेल विमान खरेदी वरून सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अनिल अंबानींच्या अडचणीत भर पडली आहे. अनिल अंबानी आणि त्यांच्या उद्योग समूहातील दोन वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्याची परवनागी नसावी अशी मागणी करणारी याचिका स्विडीश दूरसंचार कंपनी एरिक्सननं केली आहे.

स्विडीश कंपनीचा आरोप

अनिल अंबानींच्या कंपनीनं जाणून बुजून एरिक्सनचे ५५० कोटी रुपये थकवल्याचा स्विडीश कंपनीचा आरोप आहे.  अनिल अंबनींच्या एडीएजी उद्योग समूहाच्या डोक्यावर जवळपास ४५ हजार कोटींच कर्ज आहे.  या पार्श्वभूमीवर एरिक्सन कंपनीनं प्रत्यक्षातील १६०० कोटी रुपयांची थकबाकीची रक्कम तडजोड करून ५५० कोटींपर्यंत खाली आणली.

रक्कम देण्याची मुदतही संपली

अनिल अंबनींच्या समूहानं रक्कम ३० सप्टेंबरपर्यंत देण्यास कबुलीही दिली. प्रत्यक्षात मात्र रक्कम अदा करताना मुदत पाळण्यात आली नसल्याचा आरोप एरिक्सननं याचिकेत केला आहे. अनिल अंबानी आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना न्यायालयाच्या परवानगी शिवाय देशाबाहेर पडण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी याचिकेत करण्यात आली.