'सीमारेषेवर 450 ते 500 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत'

 सीमारेषेवर 450 ते 500 दहशतवादी घुसखोरी करु शकतात अशी माहीती सुत्रांनी दिली 

Updated: Sep 23, 2019, 06:09 PM IST
'सीमारेषेवर 450 ते 500 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत' title=

नवी दिल्ली : या आठवड्यात दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहीती समोर येत आहे. सीमारेषेवर 450 ते 500 दहशतवादी घुसखोरी करु शकतात अशी माहीती सुत्रांनी दिली आहे. सणासुदीच्या दिवसांत हा हल्ला होऊ शकतो अशी माहीती समोर येत आहे. जम्मू आणि काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पाकिस्तान आक्रमक झाला असून सीमेवर दहशतवादास प्रोत्साहन देत आहे. 

बालाकोटमध्ये दहशतवादी पुन्हा सक्रीय झाल्याचे सेना प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी म्हटले. पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात 46 सीआरपीएफ जवान शहीद झाले. त्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतातर्फे बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राईक करण्यात आले होते. त्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत.