१४ फेब्रुवारी नव्हे, तर 'या' दिवशी होणार केजरीवालांचा शपथविधी

रामलीला मैदानावर होणार शपथविधी 

Updated: Feb 12, 2020, 12:38 PM IST
१४ फेब्रुवारी नव्हे, तर 'या' दिवशी होणार केजरीवालांचा शपथविधी  title=

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. तसेच केजरीवाल यांचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून 16 फेब्रुवारी रोजी शपथविधी होणार आहे. 

आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल १६ फेब्रुवारीला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. रामलीला मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडणारेय. केजरीवाल सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आपनं ७० पैकी ६२ जागा जिंकून तिसऱ्यांदा दिल्लीची सत्ता काबिज केलीय. भाजपला केवळ आठ जागा मिळाल्या असून काँग्रेसला दुसऱ्यांदा भोपळा फोडता आलेला नाही.  

तसेच आज आम आदमी पार्टीच्या आमदारांची बैठक होणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या घरी आमदारांची बैठक बोलवली आहे. तसेच दिल्लीत भाजपने आपल्या अपयशाचे आत्मचिंतन करण्यासाठी बैठक बोलावली आहे. मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी निवडणुक निकालात दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल यांना पसंती दिली आहे. दिल्लीत 70 जागांपैकी 62 जागांवर आम आदमी पार्टीने विजय मिळवला आहे 

भाजपला फक्त 8 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने यंदाच्या तुलनेत अधिक जागा मिळवल्या. मात्र 10 चा आकडा पार करू शकले नाहीत. काँग्रेसला तर आपलं खातंच खोलता आलेलं नाही.