लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे लालूंचा अन्नत्याग

डॉक्टरांनी दिली याविषयीची माहिती  

Updated: May 26, 2019, 02:31 PM IST
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे लालूंचा अन्नत्याग title=

रांची : loksabha election 2019 राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी अन्नत्याग केल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (आरआयएमएस) डॉक्टरांनी याविषयीची माहिती दिली. 

निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्यांच्यात हा बदल झाल्याचं कळत आहे. बिहारमध्ये राजदला आलेल्या अपयशामुळे त्यांची ही अवस्था झाल्याचं कळत आहे. ज्यामुळे लालू यांच्यावर उपचार करणाऱ्यांपुढेही काही अडचणी उभ्या राहिल्याचं कळत आहे. सध्याच्या घडीला लालू प्रसाद यादव यांचं कुटुंब आणि त्यांचे समर्थकही चिंतातूर असल्याचं कळत आहे. अपूर्ण झोप आणि अन्नत्याग यांमुळे त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचारांमध्येही मोठ्या अडचणी येत आहेत. 

अतितणावामुळे त्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याची बाब आता उघड होत आहे. दरम्यान, लालू सध्या चारा घोटाळा प्रकरणी कारावासाची शिक्षा भोगत आहेत. या परिस्थितीत राजद नेते रामविलास पासवान, नलिन वर्मा यांनी त्यांची भेट घेतली. या नेतेमंडळींनी येत्या काळात विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागावं, असा सल्ला यावेळी लालूंनी त्यांना दिल्याचं कळत आहे. 

लोकसभा निवडणुकीत राजदचा दारुण पराभव झाला होता. बिहारमध्ये राजदला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. लोकसभेच्या बिहारमधी ४० जागांपैकी रालोआने ३९ जागांवर विजय मिळवला. तर, महागठबंधनला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं.  लालू प्रसाद यांच्या अनुपस्थितीत राजदची ही पहिलीच लोकसभा निवडणूक. पण, त्यातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्याचाच धक्का लालू यांना बसला असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.