Assembly Elections Results 2023 : तीन राज्यांतल्या भाजपच्या विजयानंतर थोड्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. आमच्यासाठी देशात चारच जाती महत्वाच्या आहेत. या चार जातींना भाजपने महत्व दिले. यामुळेच भाजपने मोठा विजय संपादीत केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
आत्मनिर्भर भारताचा विजय झाला आहे. भाताच्या विकासासाठी राज्यांचा विकास या विचारांचा विजय झाला आहे. आवाज तेलंगणापर्यंत पोहचायला पाहिजे. सर्व मतदारांचे आभार मानतो. मध्यप्रदेश, राजस्थान तसेच छत्तीसगडच्या जनतेने भाजपवर विश्वास दाखवला आहे. तलेगंणामध्ये देखील भाजपला मिळणारे समर्थन वाढत आहेत.
माझी जबाबदारी आणखी वाढलेय. आजही जातीय तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र, माझ्यासाठी देशात चार प्रमुख जाती महत्वाच्या आहेत. नारी शक्ती, युवा शक्ती, किसान आणि गरीब परिवार या चारच जाती आमच्यासाठी महत्वाच्या जाती आहेत. या चार जातींना सक्षम करणे म्हणजेच देशाला सशक्त करणे आहे. या चारही जातींनी भाजपवर विश्वास दाखवला आहे. प्रत्येक वंचित, शेतकरी आणि गरिब व्यक्तीला वाटत आहे ही निवडणुक त्यांनी जिंकली आहे. प्रत्येक नव्या मतदाराल तसेच महिलांना हा विजय त्यांच्या वाटत आहे.
चार राज्यात झालेल्या विधानसभा निकालात तीन राज्यात भाजपचंच कमळ फुललंय. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमत मिळालंय. तर, तेलंगणामध्ये सत्ताधारी बीआरएसच्या गाडीला काँग्रेसच्या हाताने ब्रेक लावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट या निकालात पुन्हा एकदा दिसून आलीय. तर अमित शाहांची चाणक्यनीती यशस्वी ठरलीय.