बकरी ईद निमित्त पंतप्रधानांकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

देशभरात ईदचा उत्साह; हजारो मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा

Updated: Aug 22, 2018, 10:06 AM IST
बकरी ईद निमित्त पंतप्रधानांकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा title=

मुंबई: मुस्लिम बांधवांचा ईद हा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. या सणाला ईद उल अझाह असे म्हणतात. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ईदच्या सणानिमित्त मुस्लिम बांधवांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यानत, आज सकाळीच कुर्ला रेल्वे स्थानकाच्या बाहेर हजारोच्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. कुर्ला पूर्वेच्या रेल्वे स्थानकासमोरील जागेत शांततेत नमाज अदा करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. 

ईद सणानिमित्त मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देत आहेत.