देशभरातील बँक कर्मचारी वेतनवाढीसाठी आज, उद्या संपावर

 भारतीय बँक संघानं कर्मचाऱ्यांचा पगार केवळ २ टक्के वाढवला या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. या पगार वाढीसाठी ५ मे रोजी बैठक झाली होती मात्र त्यात तोडगा निघू शकला नाही.

Updated: May 30, 2018, 08:34 AM IST
देशभरातील बँक कर्मचारी वेतनवाढीसाठी आज, उद्या संपावर title=

मुंबई: वेतनवाढीच्या मागणीसाठी सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. देशभरातील तब्बल १० लाखांपेक्षा अधिक कर्मचारी आज बुधवार, ३० मे) आणि उद्या बुधवार, ३१ मे) असे सलग दोन दिवस संपावर जात आहेत. या संपाचा फटका बँक ग्राहकांना बसणार आहे. बँक कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीचा करार ३१ ऑक्टोबर २०१७ ला संपलाय. त्यामुळे १ नोव्हेंबर २०१७ पासून नवीन वेतनवाढ होणं अपेक्षित आहे.

दरम्यान, भारतीय बँक संघानं कर्मचाऱ्यांचा पगार केवळ २ टक्के वाढवला या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. या पगार वाढीसाठी ५ मे रोजी बैठक झाली होती मात्र त्यात तोडगा निघू शकला नाही.

अधिक माहितीसाठी पहा व्हिडिओ