बॅंक कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकारला विरोध; २२ ऑगस्टपासून जाणार संपावर

यूनियम फोरम ऑफ बॅंक यूनियन्स (यूएफबीयू) ने २२ ऑगस्टपासून देशव्यापी संप पूकारणार असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने बॅंकींग क्षेत्रात आणलेल्या नव्या बदलांना विरोध करण्यासाठी हा बंद पूकारण्यात येणार आहे.

Updated: Aug 17, 2017, 10:46 PM IST
बॅंक कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकारला विरोध; २२ ऑगस्टपासून जाणार संपावर title=

कोलकाता : यूनियम फोरम ऑफ बॅंक यूनियन्स (यूएफबीयू) ने २२ ऑगस्टपासून देशव्यापी संप पूकारणार असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने बॅंकींग क्षेत्रात आणलेल्या नव्या बदलांना विरोध करण्यासाठी हा बंद पूकारण्यात येणार आहे.

यूएफबीयूचे पश्चिम बंगालचे संयोजक सिद्धार्थ खान यांनी म्हटले आहे की, सरकार सुधारणांच्या नावाखाली बॅंकांचे खासगीकरण आणि एकत्रीकरण करू इच्छिते. तसेच, बॅंक बोर्ड ब्यूरो (बीबीसी) च्या माध्यमातून सार्वजनीक क्षेत्रातील सर्व बॅंकांना एकाच बॅंकेच्या छताखाली आणून बॅंकींग गुंतवणूक कंपनीच्या माध्यमातून आणि सरकारी बॅंकांमधून सरकारची भागीदारी कमी करून ४९ टक्क्यांपेक्षाही कमी करण्यात आले आहे.

खान यांनी पूढे म्हटले आहे की, सार्वजनीक क्षेत्रातील बॅंकांची नॉन परफॉर्म्ड अॅसेट ६.८३ कोटी रूपयांवर पोहोचला आहे. जो चिंतेचा विषय आहे. आर्थीक डबघाईला आलेल्या बॅंकांना अडचणीतून बाहेर काढण्याऐवजी सरकार या बॅंकांना अधीकच खड्ड्यात घालू पाहात आहे असेही खान यांनी म्हटले आहे.