RBI च्या एका निर्णयामुळं Home Loan चा हप्ता वाढणार? लवकरच होणार घोषणा

RBI News : देशातील सर्वोच्च बँक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरत पतधोरण जाहीर करण्यात येणार आहे. 

सायली पाटील | Updated: Apr 4, 2024, 10:56 AM IST
RBI च्या एका निर्णयामुळं Home Loan चा हप्ता वाढणार? लवकरच होणार घोषणा  title=
bank news RBI Monetary Policy Committee interest rates latest update

RBI Monetary Policy Home loan Interest News : आर्थिक वर्ष बदलल्यानंतर देशाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या तरतुदींनुसार काही महत्त्वाचे आर्थिक बदल होतात. याच बदलांचा सर्वसामान्यांच्या खिशावरही परिणाम होतो. अशा या बदलांमध्ये महत्त्वाची सूत्र हाताळणारी आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक येत्या काळात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते. 

सध्या आरबीच्या द्वैमासिक आढावा बैठकीला सुरुवात झाली असून, यामध्ये 2024-25 या आर्थिक वर्षातील पहिल्या दोन महिन्यांचा आर्थिक आढावा घेतला जाणार असून, त्यानंतर शुक्रवारी (5 एप्रिल) बँक पतधोरण जाहीर करणार आहे. गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या आढावा बैठकीमध्ये आता नेमके कोणते मोठे निर्णय घेतले जातात यावरच अनेकांची नजर आहे. 

यामध्ये सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न म्हणजे Home Loan अर्थात गृहकर्ज महागणार का? तर, महागाई आणि जागतिक राजकीय आणि इतर परिस्थितीचा एकंदर आढावा घेचा नव्टया आर्थिक वर्षातील पहिल्या बैठकीतही मागील बैठकांप्रमाणं व्याजदर जैसे थे ठेवले जाण्याचा अंदाज अर्थविषयक अभ्यासक आणि तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळं तूर्तास कर्जाचा हप्ता वाढणार नारी, अशीच दिलासादायक चिन्हं पाहायला मिळत आहेत. 

मागील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये आरबीआयनं रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्यावेळी हा आकडा 6.5 टक्क्यांवर पोहोचला आणि ही अखेरची वाढ ठरली. तेव्हापासून मागील 6 द्वैमातिक पतधोरणांदरम्यान बँकेनं रेपो रेटमध्ये कोणतेही मोठे बदल केले नाहीत. 

हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : आदेशाची पायमल्ली केली तर...; सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाला झापलं 

सर्वांच्याच नजरा व्याजदरकपातीवर असताना आता एसबीआयच्या एका निरीक्षणपर अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जिथं सध्यातरी व्याजदरांमध्ये कपात अपेक्षित नसली तरीही 2025 च्या आर्थिक वर्षामध्ये आरबीआय तिसऱ्या तिमाहीत व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्याचे संकेत असल्याचं स्पष्ट होत आहे. 

देशांतर्गत उत्पन्न वाढीच्या आघाडीवर सकारात्मक वातावरण आणि महागाई दरही नियंत्रित पातळीवर असूनही तो आरबीआयच्या 4 टक्के लक्ष्यापुढे टिकून आहे. यंदाच्या वर्षी मोठे आर्थिक बदल अपेक्षित नसल्याचं सांगितलं जात आहे.