Electral Powder बनवणाऱ्या या कंपनीचा शेअर देणार दमदार रिटर्न; जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

 शेअर बाजारात पैसा गुंतवण्याआधी सर्वात महत्वाचे म्हणजे संबधीत शेअर किंवा कंपनीवर सखोल संशोधन करणे.

Updated: Aug 28, 2021, 07:51 AM IST
Electral Powder बनवणाऱ्या या कंपनीचा शेअर देणार दमदार रिटर्न; जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला title=

मुंबई : शेअर बाजारात पैसा गुंतवण्याआधी सर्वात महत्वाचे म्हणजे संबधीत शेअर किंवा कंपनीवर सखोल संशोधन करणे. तुमच्याकडे शेअरचा रिसर्च नसेल तर तुम्ही तुमचा कष्टाची पैसा नशिबाच्या भरवशावर सोडून देत आहात असा त्याचा अर्थ होतो. 

मार्केट एक्सपर्ट संदिप जैन यांनी तुमच्यासाठी एक दमदार शेअर निवडला आहे. त्यांनी 'झी मीडिया'शी बोलताना FDC स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. FDC ही जूनी कंपनी असून 1936 पासून काम करीत आहे. आपण सर्वांनी या कंपनीचा प्रोडक्ट वापरला आहे. ही कंपनी इलेक्टॉल बनवते. तसेच जोकोन, माइकोडर्म,  तसेच इतर औषधंदेखील बनवते. 

जैन यांनी म्हटले की, हा स्टॉकची किंमत स्वस्त तसेच फंडामेंटल्स मजबूत आहेत. लवकरच या स्टॉकमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. कंपनीचा मागीलवर्षी प्रॉफिट अफ्टर टॅक्स 308 कोटी इतका होता. कंपनीवर सध्या कोणतेही कर्ज नाही. कंपनीच्या प्रमोटर्सकडे 70 टक्के मजबूत होल्डिंग्स आहेत. 

FDCचा नेट प्रॉफिट मार्जिन साधारण 22-23 टक्के आहे. विशेष म्हणजे कंपनीने मागील वर्षी 450 रुपयांचा बायबॅक देखील केला आहे. गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये दीर्घ अवधीसाठी गुंतवणूक करायचा सल्ला जैन यांनी दिला आहे. त्यासाठी 400 ते 450 रुपयांपर्यंतचे लक्ष दिले आहे.