नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून फिल्मी सितारे राजकारणात उतरत आहेत. सपना चौधरी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असताना आता भोजपुरी गायक आणि अभिनेता दिनेश लाल यादव निरहुआने भाजपात प्रवेश केल्याचे समोर आले आहे. निरहुआने लखनऊमध्ये भाजप प्रवेश केला आहे.
भोजपुरी अभिनेता निरहुआने योगी आदित्यनाथ यांच्यासह लखनऊमध्ये भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी निरहुआसह त्याचे काही सहकारीही उपस्थित होते. मात्र निरहुआ लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. परंतु निरहुआची लोकप्रियता पाहता पक्षाला फायदा होणार आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूड आणि भोजपुरी अभिनेता रवि किशन सक्रिय राजकारणात सहभागी होण्यास तयार आहे. लोकसभा निवडणूक लढवणार असून कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल हे पक्ष ठरवणार असल्याचे बुधवारी रवि किशनने सांगितले.
Actor & BJP leader Ravi Kisan: I will contest in the upcoming Lok Sabha elections but the party will decide from where. pic.twitter.com/177DnXJnAQ
— ANI (@ANI) March 27, 2019
रवि किशन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओत रवि किशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करत देशातील पहिले पंतप्रधान आहेत जे १३० अब्ज जनतेसाठी चौकीदार बनले आहे. पहिले पंतप्रधान आहेत ज्यांच्यावर कोणताही आरोप लावण्यात आलेला नाही. २०१९ च्या निवडणुकीत मोदींचेच सरकार येणार असल्याचे रवि किशनने म्हटले आहे.