फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

 फ्रीज, एसी, आणि वॉशिंग मशिनच्या या वस्तू खरेदी करण्याच्या विचारात असला तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण या वस्तूंच्या किंमती नोव्हेंबरमध्ये वाढणार आहेत. या वस्तूंच्या किंमतीमध्ये 3 ते 5 टक्क्यांनी वाढ होणार आहे. उत्पादकांनी उत्पादन खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत.

Updated: Oct 30, 2017, 11:52 AM IST
फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी title=

नवी दिल्ली : फ्रीज, एसी, आणि वॉशिंग मशिनच्या या वस्तू खरेदी करण्याच्या विचारात असला तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण या वस्तूंच्या किंमती नोव्हेंबरमध्ये वाढणार आहेत. या वस्तूंच्या किंमतीमध्ये 3 ते 5 टक्क्यांनी वाढ होणार आहे. उत्पादकांनी उत्पादन खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत.

ग्राहकांना मुख्यतः डिसेंबर पासून वाढीव किंमत मोजावी लागणार आहे. कारण किरकोळ विक्रेते प्रथम ज्या वस्तू दिवाळीच्या वेळी नाही विकले गेले असा स्टॉक विक्रीला काढतील त्यानंतर नवीन स्टॉक वाढवलेल्या किंमतीनुसार विकला जाईल. त्यामुळे जर या वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आताच विकत घेणे तुम्हाला फायद्याचे ठरु शकते.