Good News : 'पीएफ'प्रमाणे 'ग्रॅच्युएटी' होणार ट्रान्सफर, बिनधास्त नव्या कंपनीत व्हा रुजू

एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत रूजू होताना ग्रॅच्युईटीचं काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण आता ग्रॅच्युईटीसाठी जुन्या कंपनीमध्ये हेलपाटे मारण्याची आवश्यकता भासणार नाही. EPF ची रक्कम जशी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर होते, तशीच नोकरदारांच्या ग्रॅच्युएटीची रक्कम देखील ट्रान्सफर करता येणार आहे.

Updated: Mar 26, 2021, 07:36 PM IST
Good News : 'पीएफ'प्रमाणे 'ग्रॅच्युएटी' होणार ट्रान्सफर, बिनधास्त नव्या कंपनीत व्हा रुजू title=

मुंबई : एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत रूजू होताना ग्रॅच्युईटीचं काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण आता ग्रॅच्युईटीसाठी जुन्या कंपनीमध्ये हेलपाटे मारण्याची आवश्यकता भासणार नाही. EPF ची रक्कम जशी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर होते, तशीच नोकरदारांच्या ग्रॅच्युएटीची रक्कम देखील ट्रान्सफर करता येणार आहे.

याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेऊन नियम लागू करण्यात येईल, असे केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. एखाद्या कंपनीत 10 वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्याला ग्रॅच्युएटीचा लाभ मिळतो..

केंद्र सरकार सध्याच्या ग्रॅच्युएटीच्या रचनेत काय बदल करणार आहे? 
केंद्र सरकार, कर्मचारी संघटना आणि उद्योग यांच्यामधील ग्रॅच्युएटीच्या रचनेत बदल केले जाणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रॅच्युएटीला सिटीसीचा एक आवश्यक भाग बनवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याबाबत पुढील महिन्यात अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.

आता पीएफ इतकेच ग्रॅच्युएटीची रक्कम मिळणे देखील सोप्पे होणार आहे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या कंपनीत रुजू करायच्या विचारात असाल तर टेन्शन घेण्याचं काही कारण नाही.