बिहार निवडणूक : दुसऱ्या टप्प्यात सरासरी ५५ टक्के मतदान

बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यातील ९४ जागांसाठी सरासरी ५५ टक्के मतदान झाले.  

Updated: Nov 3, 2020, 11:04 PM IST
बिहार निवडणूक : दुसऱ्या टप्प्यात सरासरी ५५ टक्के मतदान  title=
संग्रहित छाया

पाटणा : बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यातील ९४ जागांसाठी सरासरी ५५ टक्के मतदान झाले. राज्यपाल फग्गू चौहान, मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव, एलजेपीचे नेते चिराग पासवान यांनी मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणुकीत राघोपूरमधून तेजस्वी यादव, हसनपूरमधून तेज प्रताप यादव, चंद्रिका राय, बांकीपूर मधून शत्रुघ्न सिन्हाचे चिरंजीव लव सिन्हा, भाजपचे नितीन नवीन, प्युरल्स पक्षाच्या पुष्पम प्रिया, नंदकिशोर यादव यांचा समावेश आहे. 

बिहारमध्ये आज दुसर्‍या टप्प्यातील ९४ जागांवर मतदान झाले आहे. यात १ हजार ४६३ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १ हजार ३१६ पुरुष उमेदवार तर १४६ महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर, एक ट्रान्सजेंडर आहे.  कोरोनामुळे निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ एक तासाने वाढविली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत ९४ जागांपैकी ८६ जागांसाठी मतदान झाले. उर्वरित ८ जागांवर सकाळी ७ ते सकाळी ४ या वेळेत मतदान झाले.

आज राघोपूरमधून तेजस्वी यादव, हसनपूरमधून तेज प्रताप यादव,  चंद्रिका राय, बांकीपूर मधून शत्रुघ्न सिन्हाचे चिरंजीव लव सिन्हा, भाजपचे नितीन नवीन, प्युरल्स पक्षाच्या पुष्पम प्रिया, नंदकिशोर यादव यांचे भवितव्य यंत्रात बंद झाले.

२०१५ ला कोण किती जागा जिंकल्या?

जेडीयू आणि भाजपने ९४ पैकी ५० जागा जिंकल्या होत्या. जेडीयूने ३० तर भाजपने २० जागा जिंकल्या होत्या. आरजेडीने सर्वाधिक ३३ जागा जिंकल्या. 
काँग्रेसने ७ तर अन्य उमेदवारांना ४ जागा मिळाल्या.