चारा घोटाळा : लालू यांच्या शिक्षेवर आज होणार निर्णय

सीबीआयच्या विशेष कोर्टाने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील आणखी एका प्रकरणात दोषी ठरवले आहे.दुमका कोषागार प्रकरणी लालू यांच्या शिक्षेवर आज निर्णय होणार आहे. शिक्षेच्या सुनावणीवरील चर्चा पूर्ण झाली असून आज याचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Updated: Mar 24, 2018, 09:22 AM IST
चारा घोटाळा : लालू यांच्या शिक्षेवर आज होणार निर्णय  title=

रांची : सीबीआयच्या विशेष कोर्टाने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील आणखी एका प्रकरणात दोषी ठरवले आहे.दुमका कोषागार प्रकरणी लालू यांच्या शिक्षेवर आज निर्णय होणार आहे. शिक्षेच्या सुनावणीवरील चर्चा पूर्ण झाली असून आज याचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

यासंबंधीचा निर्णय १५ मार्च ला देण्यात येणार होता. हा निर्णय ४ वेळा पुढे ढकलण्यात आला.

१९ दोषी आणि १२ मुक्त 

चारा घोटाळ्याच्या दुमका कोषागारमधून ३ कोटी १३ लाख रुपये हडपण्याप्रकरणी ३१ जणांविरुद्ध सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा बहुप्रतिक्षीत निर्णय सोमवार (१९ मार्च) ला दुपारी आला. यामध्ये विशेष न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी लालू यांच्यासहित १९ जणांना दोषी ठरविण्यात आले. तसेच माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा, ममाजी आमदार ध्रुव भगत, माजी खासदार जगदीश शर्मा, माजी मंत्री विद्यासागर निषाद, माजी आमदार आर.के. राणा यांच्यासहिती १२ जणांना पुराव्याअभावी मुक्त करण्यात आले.

शिक्षा आणि दंडही 

याप्रकरणी लालू यादव यांच्यासह बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनी ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोबतच दोघांनाही ५ लाखांचा दंडही ठोठावण्यात आलाय. या प्रकरणाचा युक्तीवाद १९ जानेवारीला पूर्ण झाला होता आणि कोर्टाने निकाल राखून ठेवला होता.

माजी मुख्यमंत्री मिश्राही दोषी

या प्रकरणात लालू यादव यांच्यासोबत बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांनाही ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआय आर्थिक गुन्हे शाखेनुसार, ९५० कोटी रूपयांच्या चारा घोटाळा संबंधी चाईबासा कोषागारातून ३५ कोटी ६२ लाख रूपये चुकीच्या मार्गाने काढल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

लालू यादव आधीच तुरुंगात

देवघर कोषागार प्रकरणासाठी लालू यादव आधीच साडे तीन वर्षांची शिक्षा भोगत आहेत. ते सध्या रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात कैद आहेत. गेल्या ६ जानेवारीला सीबीआयच्या कोर्टाने लालू यादव यांनी शिक्षा सुनावली होती.