कर्जाचा बोजा, सावकारांकडून अत्याचार; संपू्र्ण कुटुंबानेच उचललं टोकाचं पाऊल

सावकरांनी पैशांसाठी कुटुंबियांचा अतोनात छळ केला आणि...

Updated: Nov 10, 2022, 04:19 PM IST
कर्जाचा बोजा, सावकारांकडून अत्याचार; संपू्र्ण कुटुंबानेच उचललं टोकाचं पाऊल title=

आर्थिक चणचणीमुळे अनेकदा काही लोक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाचा (Loan) पर्याय स्विकारतात. काही वेळा हे कर्ज फेडलं जातं. पण काही )वेळा त्या व्यक्तीचे संपूर्ण कुटूंबच या कर्जाच्या ओझ्याखाली दाबलं जातं. तर काही वेळा कर्जबाजारी व्यक्ती आपलं आयुष्य संपवून यातून सुटण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याच्या मागे कुटुंब असल्याने तो त्यांच्या काय होणार या विचाराने कधी कधी टोकाचं पाऊल उचलतो. असाच काहीसा प्रकार बिहारमध्ये (Bihar) समोर आलाय. बिहारमध्ये एका व्यक्तीने आपल्या कुटुंबालाच संपवलं आहे.

बिहारच्या नवादा येथे सामूहिकरित्या एका कुटुंबाने आपलं जीवन संपवलं आहे. आदर्श सोसायटीत एकाच कुटुंबातील 6 जणांनी विष प्यायले, त्यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर वाचलेल्या मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वसुलीच्या छळाला कंटाळून कुटुंबाने कर्जबाजारी होऊन विष प्राशन केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मूळचा राजौली येथील रहिवासी असून नवादा शहरातील नवीन भागात भाड्याच्या घरात कुटुंबासह राहत होता. ही नवाडा येथील विजय बाजार येथे फळांचे दुकान चालवायची. यासाठी त्याने काही लोकांकडून कर्ज घेतले होते जे तो फेडू शकला नाही. यानंतर खासगी सावकारांनी पैशांसाठी त्याच्याकडे तगादा लावला होता. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांवरही अत्याचार होत होते. यालाच कंटाळून संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे आत्महत्या करण्याचे भयानक पाऊल उचलले.