रस्त्यावर बाईक स्टंट करत होता तरुण, तोल गेला आणि... पाहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हि़डीओ व्हायरल होत आहे.

Updated: Dec 30, 2021, 09:21 PM IST
रस्त्यावर बाईक स्टंट करत होता तरुण, तोल गेला आणि... पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडिया हे असं जग आहे जेथे लोकं नेहमीच लोकं ऍक्टीव असतात. येथे लोकं प्रसिद्धीसाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात. मग त्यासाठी ते त्यांच्या जिवाची देखील पर्वा करत नाहीत. अशातच अनेकदा लोकांनी आपला प्राण देखील गमावलं आहे. तर अनेक लोकं गंभीर झाले आहेत. आपण सोशल मीडियावरती असे व्हिडीओ नेहमीच बघतो. परंतु काही लोकं अशा उदाहरणामधून देखील सुधारण्याचं नाव घेत नाहीत.

सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हि़डीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बाईक स्टंटचा आहे. ज्यामध्ये बाईक स्टंट करताना त्याच्यासोबत जो काही प्रकार घडतो. तो पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि तुम्हाला त्या मुलाबद्दल फार वाईट वाटेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा बाईक चालवत असतो आणि हळूहळू तो त्याच्या बाईकचा वेग वाढवतो. तो रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला कट मारण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढ्यातच आपल्या गाडीची व्हिली मारण्याचा प्रयत्न करतो.

या तिन्ही गोष्टी एकत्र करण्याच्या नादात या तरुणाचा बाईवरुन ताबा सुटतो आणि हा तरुण खाली पडतो. सुदैवाने या तरुणाने हेल्मेट घातले होते, नाहीतर फार मोठा अनर्थ घडला असता.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर gui_moreyra नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 9 डिसेंबर रोजी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे. आतापर्यंत 9 लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. त्याचबरोबर डझनभर लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सचे म्हणणे आहे की, 'असे करून तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालत आहात', तर काहींनी असे म्हटले आहे की, 'केवळ प्रोफेश्नल लोकांनीच असे काम केले तर ते चांगले आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मात्र, या मुलाचा स्टंट अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. या मुलाचे कौतुक करताना अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका वापरकर्त्यावर टिप्पणी करताना लिहिले, 'भाऊ साईड कट अप्रतिम होती, पण पुढच्या वेळी काळजी घे.' त्याचप्रमाणे आणखी एका युजरने 'कधीही हार मानू नका' अशी कमेंट करत या तरुणाला प्रोत्साहित केलं आहे.