Bird Flu : चिकन खाणाऱ्यांसाठी बॅडन्यूज, जगभरात वाढल्या चिंता

Bird Flu: तुम्हाला ही चिकन खाण्याची सवय असेल तर तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे.

Updated: Nov 1, 2022, 11:14 PM IST
Bird Flu : चिकन खाणाऱ्यांसाठी बॅडन्यूज, जगभरात वाढल्या चिंता title=

Bird Flue : चिकन प्रेमींसाठी बॅडन्यूज आहे. कारण बर्ड फ्लूने (Bird Flue ) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे जगभरातील लोकांचं टेन्शन वाढलंय. बर्ड फ्लू सध्या वेगाने पसरत आहे. बर्ड फ्लू (bird flu outbreak in kerala) रोखण्यासाठी केरळमध्ये 20 हजार पक्ष्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इंग्लंडमध्येही पोल्ट्री फार्म मालकांना कोंबड्यांना सुरक्षित ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 7 नोव्हेंबरनंतर सर्व लोकांनी कोंबड्यांना घरामध्येच ठेवावे, असे सांगण्यात आले आहे.

केरळमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी बदके, कोंबडी यांच्यासह पाळीव पक्ष्यांची अंडी आणि मांस खाण्यावर आणि विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. हा धोका लक्षात घेता भारत सरकारही (bird flu in india) पूर्णपणे सतर्क झाले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने केरळमधील अलप्पुझा येथे एक पथक पाठवले आहे.

मानवांना देखील संक्रमित करते

डब्ल्यूएचओच्या मते, एव्हियन इन्फ्लुएंझा टाइप-ए मध्ये मानवांना आजारी बनवण्याची क्षमता आहे. मानवाला याची लागण क्वचितच होत असली तरी संसर्ग झाल्यानंतर तो मानवांसाठी अधिक धोकादायक बनतो. त्यामुळे संक्रमित व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. काळजी घेतल्यास ते टाळता येऊ शकते. डब्ल्यूएचओच्या मते, हे टाळण्यासाठी हात वारंवार धुवावेत. खोकताना तोंड रुमालाने झाकले पाहिजे. कोणत्याही आजारी व्यक्तीपासून दूर राहावे. अंडी आणि मांस खाणे देखील टाळावे.

बर्ड फ्लू म्हणजे काय?

 बर्ड फ्लूचे सहसा अनेक प्रकार असतात, परंतु H5N1 नावाचा बर्ड फ्लूचा विषाणू मानवांमध्ये सर्वाधिक पसरताना दिसला आहे. त्याचा मानवांवर वाईट परिणाम होतो. हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य आहे आणि त्याचा मृत्यू दरही खूप जास्त आहे. त्याला एव्हियन इन्फ्लुएंझा टाईप-ए असेही म्हणतात. याचे पहिले प्रकरण 1997 मध्ये हाँगकाँगमध्ये दिसले होते. यानंतर ते इतर देशांमध्येही वेगाने पसरले.