पुन्हा एकदा 'वन नेशन- वन इलेक्शन' मुद्दा पुढे येतोय...

पुन्हा एकदा 'वन नेशन- वन इलेक्शन' या संकल्पनेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते मंगळवारी 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलत होते. 

Updated: Jul 4, 2018, 11:17 AM IST
पुन्हा एकदा 'वन नेशन- वन इलेक्शन' मुद्दा पुढे येतोय... title=

नवी दिल्ली : देशात सतत कुठे ना कुठे निवडणुका सुरू असतात. या सततच्या निवडणुकांमुळे जनतेच्या पैशाची मोठ्याप्रमाणावर उधळपट्टी होते, असे मत केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. यानिमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा 'वन नेशन- वन इलेक्शन' या संकल्पनेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते मंगळवारी 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलत होते. 

यावेळी त्यांनी म्हटले की, देशात सतत निवडणुका होत असल्याने, जनतेच्या पैशाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. या निवडणुकांसाठी बाहेरून अधिकाऱ्यांची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण होतात, असे प्रसाद यांनी म्हटले.

आपल्या देशातील लोकशाही 70 वर्ष जुनी आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रक्रियेत स्थैर्य आणण्याची गरज आहे. यादृष्टीने आता आम्ही कायदा आयोगाच्या अहवालाची प्रतिक्षा करत असल्याचे, रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले. 

गेल्या काही काळापासून भाजपाचे काही नेते 'वन नेशन- वन इलेक्शन'चा मुद्दा सातत्याने पुढे रेटताना दिसत आहेत. या माध्यमातून देशातील सर्व निवडणुका एकाचवेळी घेतल्या पाहिजेत, असा भाजपा नेत्यांचा आग्रह आहे.