'हनुमानजी मुस्लिम होते', भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

 बुक्कल हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात.

Updated: Dec 20, 2018, 08:15 PM IST
'हनुमानजी मुस्लिम होते', भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य  title=

नवी दिल्ली : पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीराम भक्त हनुमान विषयावर खूप चर्चा रंगवल्या गेल्या, अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. यावर भाजपा नेता बुक्कल नवाब यांनी वादग्रस्त विधान केले आहे. बुक्कल हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. यावेळेसही त्यांनी स्वत:हून वाद ओढवून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. हनुमान हे मुस्लिम होते असे वक्तव्य लखनऊमध्ये बुक्कल यांनी माध्यमांसमोर केले. 'जेव्हा हनुमानाला जाती धर्मात पाहण्याची वेळ येते तेव्हा मला वाटतं ते सर्व जगाचे होचे, सर्व जाती-धर्माचे ते लाडके होते. मला असं वाटत ते हनुमान हे मुस्लिम होते' असे बुक्कल यांनी सांगितले. मुस्लिम धर्मामध्ये रेहमान, रमजान, फरमान, झिशान, कुर्बान अशी जी नावे ठेवली जातात ती जवळजवळ हनुमानाच्या नावावरच ठेवली जातात किंवा त्यांच्याशी मिळतीजुळती असतात.

नवा शोध  

आता एवढं बोलुनच ते थांबले नाहीत. किती जणांची नाव हिंदु बांधवांनी हनुमानजींच्या नावावरुन ठेवली आहेत ? हे त्यांनी सांगावं असे ते म्हणाले. किमान हनुमान हे नाव तरी ठेवू शकतात असा सल्लावजा वक्तव्यही त्यांनी केले. 

'हनुमानजींच्या नावाशी साधर्म्य असलेले नाव ठेवणे हे इस्लाममध्ये आहे, हे आमच्याइथे मुस्लिमांमध्येही आहे. इथेही जितकी नावे आहेत ती हनुमानजींच्या नावाशी मिळतीजुळती आहेत', असेही ते पुढे म्हणाले.

याआधीही वादात  

बुक्कल नवाब यांनी याआधीही अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. काही दिवसांपूर्वी राजधानी लखनऊमध्ये अल्पसंख्यांकाच्या मोर्चातील एका कार्यक्रमात ते अयोध्या-बाबरी मस्जिद प्रकरणावर बोलत होते. अयोध्येतील वादग्रस्त ठिकाणावर मस्जिद बांधण्याच समर्थन त्यांनी यावेळी केले होते. प्रकरण तापल्यानंतर त्यांनी आपल्या या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिले.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांनी मुस्लिम महिलांसोबत गाईलाही राखी बांधली आणि गोरक्षा करण्याचा संकल्प केला होता.