उलटा तिरंगा फडकावणाऱ्या भाजप खासदारावर टीकेची झोड!

आज देशभरात भारताचा ७१ स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय. याच दरम्यान, भाजपच्या एक खासदार मात्र उलटा तिरंगा फडकावल्यानं टीकेच्या धनी ठरल्यात.

Updated: Aug 15, 2017, 04:43 PM IST
उलटा तिरंगा फडकावणाऱ्या भाजप खासदारावर टीकेची झोड! title=

लखनऊ : आज देशभरात भारताचा ७१ स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय. याच दरम्यान, भाजपच्या एक खासदार मात्र उलटा तिरंगा फडकावल्यानं टीकेच्या धनी ठरल्यात.

उत्तरप्रदेशच्या धौरहरातून भाजपच्या खासदार रेखा वर्मा यांनी केलेल्या ध्वजारोहनाचे फोटो सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत. हे फोटो सीतापूनच्या महोलीस्थित पिसावा ब्लॉकजवळचे आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, भाजपचे काही नेते दिशातील वेगवेगळ्या भागांत तिरंगा यात्रा काढत आहेत. यात खासदार, आमदार तसंच केंद्रीय मंत्रीही मोठ्या हिरीरीनं सहभागी होत आहेत. रेखा वर्माही सीतापूरमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी झाल्या होत्या.

राष्ट्रध्वजाचा अपमान केला तर...

प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर अॅक्ट १९७१ नुसार, एखाद्या व्यक्तीनं मौखिक किंवा लिखित स्वरुपातील कोणत्याही प्रकारे राष्ट्र चिन्हांचा - राष्ट्रध्वजाचा अपमान केला तर त्याला तीन वर्षांपर्यंत कैद किंवा दंडाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. खासदार रेखा या शिक्षेसाठी पात्र ठरतात का ते चौकशीतूनच समोर येऊ शकेल.