कोरोनानंतर काळ्या बुरशीने वाढवल्या चिंता, देशात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ

देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरु असताना आता म्युकरमायकोसिसने चिंता वाढवल्या आहेत.

Updated: May 22, 2021, 02:23 PM IST
कोरोनानंतर काळ्या बुरशीने वाढवल्या चिंता, देशात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ title=

मुंबई : कोरोनाचा कहर सुरु असतानाच आता देशात म्युकरमायकोसिस (Mucormycosis) म्हणजेच काळ्या बुरजीच्या (Black Fungus) आजाराने थैमान घातलं आहे. देशात वेगवेगळ्या भागात काळ्या बुरशीच्या आजाराचे आतापर्यंत 8,848 प्रकरण समोर आली आहेत. तर 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक राज्यांनी या आजाराला महामारी घोषित केली आहे. कोरोनानंतर आता ब्लॅक फंगसने सरकारच्या चिंता वाढल्या आहेत. या आजरावर दिलं जाणारं अँटी-फंगल औषध एम्फोटेरिसिन-बी (Amphotericin B) ची मागणी वाढू लागली आहे.

शनिवार सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एम्फोटेरिसिन-बीचे एकूण 23,680 अतिरिक्त डोस देण्यात आले आहेत. रसायन व खते मंत्री (Chemicals and Fertilizers Minister) डीवी सदानंद गौडा (DV Sadananda Gowda) यांनी याबाबत माहिती दिली.

याआधी गुरुवारी दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला सल्ला देत म्हटलं होतं की, देशातील वाढत्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर औषधांची खरेदी करावी.

लखनऊमध्ये 100 रुग्ण

कोरोनानंतर ब्लॅक फंगसचे वाढते रुग्ण चिंता वाढवत आहेत. एकानंतर एक राज्यात या आजाराचे वाढते रुग्ण पाहता सरकार देखील गंभीर आहे. उत्तरप्रदेश म्युकरमायकोसिसला महामारी घोषित करणारं सातवं राज्य आहे. लखनऊमध्ये जवळपास 100 जणांवर उपचार सुरु आहेत.

10 सर्वाधिक प्रभावित राज्य

- महाराष्ट्र: राज्यात म्युकरमायकोसिसचे 1,500 हून अधिक रुग्ण आहेत. तर 90 जणांचा मृत्यू झाला आहे.
- गुजरात: म्यूकरमायकोसिसचे 1,163 रुग्ण समोर आले आहेत. आतापर्यंत 61 लोकांचा मृत्यू झाला आहे.
- मध्य प्रदेश: राज्यात म्युकरमायकोसिसचे 575 रुग्ण आढळले असून 31 जणांचा मृत्यू झाला आहे.
- हरियाणा: हरियाणामध्ये 268 रुग्ण समोर आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
- दिल्ली: दिल्लीत म्युकरमायकोसिसचे 203 रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
- उत्तर प्रदेश: राज्यात 169 प्रकरण समोर आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
- बिहार: बिहारमध्ये आतापर्यंत 103 जणांचा म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाला असून 2 जणांचा मृत्यू झालाय.
- छत्तीसगड: 101 लोकांना म्युकरमायकोसिसची लागण झाली असून एकाचा मृत्यू झालाय.
- कर्नाटक: म्युकरमायकोसिसचे 97 प्रकरणं समोर आले असून मृतांचा आकडा अजून समोर आलेला नाही.
- तेलंगणा: राज्या म्युकरमायकोसिसचे 90 रुग्ण आढळले असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

काय आहे म्युकरमायकोसिस?

काळ्या बुरशीचा हा आजार एक दुर्लभ संक्रमण आहे. ज्याला म्युकरमायकोसिस म्हटलं जातं. कोरोनाचे रुग्ण बरे झाल्यानंतर अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढत आहे. जर वेळेत यावर उपचार केला तर रुग्ण बरे होतात. हे एक फंगल इंफेक्शन आहे. हा अजार अशा लोकांना होतो. ज्यांना आधीच काही तरी आजार आहे. सध्या औषधांवर ते अवलंबुन आहेत. ज्यामुळे त्यांच्यात प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. अशा लोकांमध्ये हवेच्या माध्यमातून सायनस किंवा फुफ्फुसांमध्ये याचं संक्रमण होत आहे.