BMWची स्वस्त Sedan कार भारतात लाँच

BMW 2 Series GranCoupe ही कार चेन्नईमध्ये तयार करण्यात आली आहे.    

Updated: Oct 22, 2020, 01:07 PM IST
BMWची  स्वस्त Sedan कार भारतात लाँच title=

नवी दिल्ली : जर्मनीची दिग्गज कंपनी बीएमडब्ल्यूने (BMW)भारतात नवीन कार लाँच केली आहे. BMW 2 सीरिज मधील ग्रॅन कूप  (BMW 2 Series GranCoupe) ही कार भारतात दाखल झाली आहे. नुकताच लाँच करण्यात आलेली BMW ची किंमत देखील कंपनी कडून जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी डिझेलवर चालणाऱ्या कारची किंमत ३९.३ लाख रूपये असून पेट्रोलवर चालणाऱ्या कारची किंमत ४१.४ लाख आहे. मात्र पेट्रोलवर धावणारी कार काही दिवसांनंतर लाँच करण्यात येणार आहे. 

झी बिझनेसचे कार्यकारी संपादक स्वाती खंडेलवाल यांच्या म्हणण्यानुसार कंपनीने नुकतीच डिझेल व्हेरिएंट बाजारात लाँच केला आहे. त्यानंतर पेट्रोल व्हर्जन देखील ग्राहकांच्या सेवेसाठी बाजारात दाखल होणार आहे. ही BMW कंपनीची सर्वात स्वस्त Sedan कार आहे. या कारला बाजारात 220d स्पोर्ट्स लाइनमध्ये बाजारात आणले गेले आहे.

कारमध्ये 7 इंचाचा व्हर्च्युअल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. कारमध्ये 12.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. शिवाय या कारमध्ये २ लीटरचं इंजिन देण्यात आलं आहे. कारचं  व्हीलबेस 2670 मिमी आहे. ड्युअल टोनमध्ये दिले गेलेलं इंटीरियर अत्यंत सुंदर दिसत आहे. 

BMW 2 Series GranCoupe कारमध्ये 190 bhp पॉवर आणि 400Nm टॉर्क आहे. गाडीचं मायलेज 18.6 kmpl आहे.  7.5 सेकंदात 100 kmph धावण्याची क्षमचा या करमध्ये आहे. यामध्ये 8 स्पीड टॉनिक ट्रान्समिशन देखील आहे. 

BMW 2 Series GranCoupe ही कार चेन्नईमध्ये तयार करण्यात आली आहे. बीएमडब्ल्यू ग्रुप भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे अध्यक्ष विक्रम पावह यांच्या सांगण्यानुसार, भारतीय बाजार वाढीसाठी आमची राणनीती अद्यापही मजबूत आहे. शिवाय कंपनी भारताच्या भविष्याबद्दल आशावादी आहे. असं देखील ते म्हणाले.