'हम आपके है कौन'चे निर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन

कलाविश्वावर शोककळा 

Updated: Feb 21, 2019, 12:08 PM IST
'हम आपके है कौन'चे निर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन  title=

मुंबई : 'हम आपके है कौन' या चित्रपटाचे निर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन झालं आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याविषयीची माहिती दिली. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी बडजात्या यांचं निधन झाल्याचं कळवलं. 

'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है', 'प्रेम रतन धन पायो', 'विवाह' या अशा इतर गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. चित्रपट निर्मिती क्षेत्रात त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांच्या जाण्यामुळे कलाविश्वातूनही दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. 

राजकुमार बडजात्या यांचे वडील ताराचंद बडजात्या यांनी राजश्री प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली होती. कौटुंबीक चित्रपटांना महत्त्वं देत अतिशय सुरेख असे चित्रपट आजवर या निर्मिती संस्थेअंतर्गत साकारण्यात आले. १९६० पासून सुरू झालेल्या राजकुमार बडजात्या यांच्या कारकिर्दीत त्यांनी बऱ्याच लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली होती.